Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ह्या भूमीतच संत एकनाथ,संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नरहरी सोनार,संत नामदेव, संत निवृत्तिनाथ, संत मुक्ताबाई, संत समर्थ रामदास, संत रोहिदास, ह्या व इतर बऱ्याच संतांनी आपल्या विचारांनी आणि साहित्यांनी समाजाला प्रेरणादायी अशी शिकवणूक दिली.
निमगाव केतकी - श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ३७० व्या जयंतीनिमित्त निमगाव केतकी येथे अखिल तेली समाज संघटना व निमगाव केतकी येथील तिळवण तेली समाजाच्या वतीने सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट मंदिरामध्ये श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पुणे - जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे लेखक व आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. समस्त तेली समाज संताजी प्रतिष्ठान कोथरूड यांच्या वतीने कर्वे नगर येथील श्री संताजी भवन येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांचे मार्गदर्शन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे अभंगाचे लेखक व आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती समस्त तेली समाज ,राजगुरूनगर यांचे वतीने साजरी करण्यात आली . बुधवार दि ०८/१२/२०२१ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत तिळवण तेली समाज कार्यालयाचे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संताजी महाराज यांची जयंती उत्सव साजरा झाला.
रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघ (उप शाखा रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ) - तेली समाजाची अस्मिता संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज जोडो रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्हयांतून या समाज जोडो रथयात्रेचा प्रवास होणार आहे. महा प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष मा.खा.रामदासजी तडस,