नारायणगाव तिळवण तेली समाजाचे सामाजिक कार्यातील गौरवास्पद कार्य व सुदिप भाऊ कसाबे यांच्याबद्दल गर्व गरिब व गरजूलोकांना मदतीचे कार्य चालू असताना सुदीपभाऊ कसाबे यांच्या पुढाकाराने गरिबांसाठी मदत म्हणून ५१०००/- रु. च्या ७०० तेलाच्या बाटल्या लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट व तिळवण तेली समाजामार्फत नारायणगाव ग्रामपंचायतीस सरपंच श्री.बाबुभाऊ पाटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहे.
घोडेगाव : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पलंग उत्सवाला घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सुरवात झाली. पलंगाच्या दर्शनासाठी नागरिक येऊ लागले आहेत.
हा पलंग येथे १० दिवस असतो. तुळजापूरच्या भवानी मातेच्या पलंगाची मिरवणूक तुळजापुरात झाल्यानंतर शिलंगणानंतर मातेची मूर्ती पलंगावर विराजमान केली जाते. विजयादशमी ते कोजागरी पौर्णिमा या काळात तुळजाभवानी माता या पलंगावर विश्रांती घेते.
मी एक पन्हाळे, पुण्याच्या अंबेगावातून धडपडत पुण्याच्या शिवेतून आलेल्या. त्यांच्या जवळ होती फक्त निमगावच्या खंडोबाचा आशिर्वादाची शिदोरी. माझ्या पूर्वजांनी या पुण्यात येऊन आपले नशीब घडविले. पणजोबांनी बरोबर शुन्य आणले होते. पुणे लष्कर मधुन त्यांनी जुने फर्नीचर विकत घेऊन किरकोळ दुरूस्ती करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. लोखंडी भंगार व हातगाडी ओढली व जुने फर्नीचर ही घेत असत.
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ?( भाग 6) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
मी संत संताजींचा विचारवंश आहे याचा अभिमान बाळगतो आणि कर्तव्याची जाणीव ही ठेवतो. मग तो अभिमान बाळगताना कुणाशी शाब्दीक दोन हात करावयास मिळणे हे माझे भाग्य समजतो. ब्राह्मणी संस्कृतीच्या मनुस्मृती विचार वंशाने आपल्या खांद्यावर हात ठेऊन पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याची ही तोंड ओळख. तीच गत मराठा समाजातील मंडळींनी केली आहे. मी मराठे आपले भाऊ आहेत का ?
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 4) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
मनुस्मृतीच्या विचार वंशााची आपण चिरफाड करतोय. ती चिरफाड केली तरच आकाशाला गवसणी घालणारे संत संताजी समजणार आहेत. प्रथम एक सत्य घटना मांडतो. संत ज्ञानेश्वरांचे पालन कर्ते संत भोजलिंग काका त्यांची समाधी संत ज्ञानेश्वर समाधी जवळ आहे. आपण जी ज्ञानेश्वरी पवित्र समजुन जपतो. त्या । ज्ञानेश्वरीत काय काय बदल केले हा भाग इथे गौन मानून प्रथम वाटचाल करू.