Sant Santaji Maharaj Jagnade
संताजी महाराजा-येई आमुच्या काजा-पाहती वाट भक्त-तुचि संताचा राजा ॥धृ॥
पुणे ही जिल्हयात एका चाकण गांवी-विठोबा मथाबाई-विठचरणी माथा ठेवी
ऐशा भक्ता पोटी आपण जन्माला याजा-संताजी महराजा-येई भक्ताच्या काजा ॥१॥
संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुण्याजवळील मावळ तालुक्यातील चाकण येथे सन १५४५ रोजी झाला. एका वारकरी संप्रदायी असलेल्या विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई यांना पुत्ररत्न झाले. महाराजांचे वडील विठोबा यांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता. संताजी १० वर्षांचे झाले आणि वडील विठोबा यांनी तेलधंद्याचा परिचय करून द्यायला सुरुवात केली शिक्षण तसे फारसे नव्हते . .
समाजबांधवांचे संघटन झाले तरच प्रश्न सुटतात- आसाराम शेजूळअहमदनगर : समाजाची उन्नत्ती व्हावी, यासाठी संघटन महत्वाचे असते. पदाधिकार्यांच्या चांगल्या कामातून हे शक्य होते. तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गेल्या काही वर्षात समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात संघटन करुन एकीचे बळ दाखवून दिल्याने प्रश्न सुटत आहे. त्यामुळे विविध उपक्रमांतून समाजाची प्रगती साध्य होत आहे
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ह्या भूमीतच संत एकनाथ,संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नरहरी सोनार,संत नामदेव, संत निवृत्तिनाथ, संत मुक्ताबाई, संत समर्थ रामदास, संत रोहिदास, ह्या व इतर बऱ्याच संतांनी आपल्या विचारांनी आणि साहित्यांनी समाजाला प्रेरणादायी अशी शिकवणूक दिली.
निमगाव केतकी - श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ३७० व्या जयंतीनिमित्त निमगाव केतकी येथे अखिल तेली समाज संघटना व निमगाव केतकी येथील तिळवण तेली समाजाच्या वतीने सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट मंदिरामध्ये श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.