श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने श्री क्षेत्र सुदुंबरे येथील संत संताजी जगनाडे महाराज समाधीस अभिषेक आणि महापूजा, सुदुंबरे संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. यावेळी यावर्षीचा पुण्यतिथी उत्सवाचे अध्यक्ष जयंत राऊत आणि उद्घाटक सिद्धेश रत्नपारखी उपस्थित होते.
संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी केला. त्यांनी हे अभंग पुन्हा लिहून काढलेत. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या काळाविषयी बरेच मतप्रवाह आहेत.
श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबई - शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना 2020
दि. 17-10-2020 दरवर्षी आम्ही हे प्रसिद्धीपत्रक छापील स्वरूपात महाराष्ट्रातील प्रत्येक सामाजिक संस्थांना पोस्टाने अथवा कुरियरने जुलै महिन्यातच पाठवत असतो. यावर्षी आलेल्या कोविड-19 च्या आपत्तीमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे हे पत्रक आपणांस उशिरा व अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देत आहोत.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे, आयोजित मोफत भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा वधू - वर फॉर्म 2021
श्री संताजी प्रतिष्ठान , कोथरूड, पुणे
आयोजित मोफत भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा. वधू - वर मेळावा
तारीख व ठिकाण नंतर कळविण्यात येईल.
‘कोराना’ संकटाशी सामना करण्यासाठी येथील रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशनच्यावतीने बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलसाठी हाई-फ्लो ऑक्सीजन थेरेपी मशीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
पुणे विधानभवन परिसातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे फाऊंडेशनचे अभिजीत श्याम पन्हाळे यांनी हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी मशीन सुपूर्द केले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, फाऊंडेशच्या संगिता पन्हाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.