Sant Santaji Maharaj Jagnade
संताजी जगनाड्यांच्या वंशावळी वरून दिसून येईल ही एकच वंशावळ उपलब्ध आहे व ती आद्धाप आव्हानहित असल्यामुळे तीच ग्राह्य म्हणून स्वीकारणे भाग आहे. शिवा ही वंशावळ व पेशवे दप्तरांतील चाकण रूमालांत उल्लेखिलेला संताजी व त्यांचा पुत्र बाळोजी यांच्या नांवाशी जुळती आहे. या वंशावळीवरून असें दिसून येईल की संताजी जगनाडे व त्याचे सोयीरसंबंध सुदुंबरे (चाकण पासून 6 मैलांवर), खेड (चाकण पासून 6 मैलावर) व चाकण येथील अगदी समीपच्या परिसरांतील आहेत.
इतिहासकार श्री. बा. सी. बेंद्रे हे संतशिरोमणी तुकाराम महाराजांचे चरित्र लेखन करण्यांत सध्यां गुतले आहेत. तुकारामाच्या अभंगासंबंधीहि संशोधन चालू आहे. हे चरित्र तयार होत असतां, तुकारामाविषयी कांही समजुती, काही भ्रामक कल्पना, कांही अनैतिहासिक प्रसंगही वर्णिले आहेत अशी स्वत:ची समजूत करून घेऊन श्री. बेंद्रे यांनी तुकाराम महाराजांचे निमळ स्वरूप जनतेपुढें ठेवण्याचें सत्कर्म करण्याचें कंकण हातीं बांधले आहे. त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे हे कोणीही कबूल करील. त्यांच्या कार्यात त्यांना सुयश लाभो अशी आमचीही इच्छा आहे. पण संशोधन करीत असतां तर्कावर विंसबून रहाणे कितपत योग्य होईल ?
इतिहासकार श्री. वा. सी. बेंद्रे यांनी संताजींसंबंधी बरेच अक्षेप घेणारे लिखाण गेल्या पांसचहा वर्षीत प्रसिद्ध केले आहे. या लिखाणाकडे श्री. कृ. ना. वैरागी यांचे प्रथम लक्ष गेले. अडतिसाव्या संताजी उत्सवाचे वेळी श्री. दा. र. वैरागी यांनी संस्थेंचें लक्ष या लिखाणाकडे वेधलें. संस्थेेचे जनरल सभेंत या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी सहाजणांची समिती नेमली. या समितीने तळेगांव येथील श्री. मनोहरपंत जगनाडे यांच्या कृपेनें वह्यांची पहाणी केली, इतर कागदपत्रे पाहिले.
नाव - सौ. विमल सतिश वाव्हळ माहेरचे नाव - विमल बबन उबाळे. जन्म - 13/07/1961 मु.पो. वाडा ता. खेड (राजगुरूनगर) जि. पुणे. आमचा हा वाडा हे गाव फार खेडेगाव आहे. भिमाशंकरपासून पायथ्याशी 30 कि.मी. अंतरावर हे आहे. तसेच हे गाव भिमा नदीच्या काठावर आहे.
आमच्या घरात पंजी, आजोबा, आजी, वडील, आई तीन चुलते व पाच आत्या हे होते. नंतर तीन चुलत्या दोन भाऊ व आम्ही दोघी बहिणी व सर्व घरातील एकूण चाळीस माणसांचा हा परिवार आहे. सर्व मुंलाची लग्ने झाली, चुलतभाऊ बहिणी बारा व आत्यांची बारा जण आता सर्व मिळून नव्वद एक संख्या आहे. यातील बरीच मंडळी कालवश झालीत. नऊ भावडांत माझे वडिल मोठे होेते.
प्रिय समाजबांधव व भक्तगण, बंधू-भगिणी, सर्वांना माझा आदरपूर्वक, स्नेह नमस्कार
तेली समाजाचे आदरस्थान व श्रध्दास्थान म्हणजे संतश्रेष्ठ संत संताजी महाराज जगनाडे यांचे समाधी स्थळ सुदूबरे हे होय.
सालाबाद प्रमाणे या वर्षी ही हा सोहळा 16 डिसेंबर 2017 ला मार्गशीर्ष कृष्ण (व) त्रयोदशी, शनिवार या दिवशी श्री श्रेत्र सुदूंबर येथे संपन्न होत असताना मोठा आनंद होत आहे.