घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 1 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
बांधलेली झापड तोडून टाकली. ही माझी कथा 1994 मध्ये प्रसिद्ध झाली होती ओबीसींच्या साहित्य विश्वातील पहिले पुस्तक ओबीसी जीवन कथा या पुस्तक रूपात ती होती. त्या काळा पर्यंत मी गाव गाड्यातुन येताना तेंव्हा घरी बैलघाना होता. बैलाला झापड ही होती. तो घाना जेंव्हा जमीनीतुन खोदून काढला तेंव्हाचा तो काळ या काळात जगण्याचा जो संघर्ष करावा लागला त्या संघर्षाची ती तोंड ओळख. नुकताच मंडल आयोग लागु झाला होता.
पुणे :- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या पक्षाला जर कोणी मानसाळले असेल तर स्व. गोपिनाथ मुंडे, अन्ना डांगे, एकनाथ खडसे यांनी. यांनी मराठा समाजाचा काँग्रेस ला अंगावर घेत ओबीसींना जागे करून भाजपा बरोबर उभे केले. यातील मुंडे यांना गाडीने मारले जसे संत तुकारामांना नेमक्या धुळवडी दिवशी विमानाने स्वर्गात घेऊन गेले. एवढी संशयित घटना घडुन ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे जन्माने ब्राह्मण असुन ही त्यांना विश्वास दिला.
मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार केंद्रात व प्रत्येक राज्यात इतर मागास वर्ग आयोग स्थापण्याची व्यवस्था झाली. काँग्रेसच्या काळात काँग्रेस विचार धारा माणनारे अध्यक्ष, सदस्य व तज्ञ नमले गेले. तरी सुद्धा सुशील कुमार शिंदेंनी मराठा कुणबी ही बनवेगीरी केलीच. फडणीसावर पर्यायाने बीजीपीवर ओबीसींवर जीव की प्राण. मी अनेक ओबीसी जवळुन पाहिलेत त्यांनी आपले जीवन बिजेपीत, आर.एस.एस. प्रणाली साठी अपर्ण केले आहे.
अमरावती चांदूर रेल्वेच्या पासुन दूर भुईखेड गावाच्या नावात खेड त्या मुळे गाव सर्व सुख सोईना पारख असलेले. पाऊस काळात तर कोणत्याही दिशेला चालत जावा या रस्त्यावर किमान दहा बारा मैल चिखल तुडवत जावे लागत होते यात जयराम गुल्हाणे वस्तीकरून रहात होते. वस्ती या साठी की गावात घर आहे पण शिवारात शेत नाही. त्यामुळे 1 मुली 2 मुलगे यांना मोठे करण्यासाठी ते गावात मिळेल ते काम. शिवारात मिळेल ती मजुरी करून वावरत होते. घर सावरत होते. याच झाकाळलेल्या घरात श्री. विठ्ललराव गुल्हाणे यांचा जन्म झाला. असेच झाकोळलेल्या घरात वावरत होते. मुलांना जगवलेे पाहिजे ही धडपड ती पुर्ण करण्यास दिवस अपुरा पडत होता.
तळेगांव दाभाडे दि. 13 :- सालाबादप्रमाणे दि. 11 एप्रिल रोजी तेली आळीतील मारूती मंदिर येथे हनुमान जयंती महोतसव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.
पहाटे 5 वाजता प्रथेप्रमाणे तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संदिप पिंगळे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. 5.30 ते 7 वा. या वेेळेत ह. भ. प. नितीन महाराज काकडे यांचे हनुमानजन्मावर कीर्तन झाले. संपूर्ण दिवसभर समितीच्या वतिने मंदिरामध्ये प्रसाद वितरित करण्यात आला. रात्री 8 वा. सौ. चित्रा जगनाडे, संदीप जगनाडे, पोपटभाऊ जगनाडे, तनुंजा जगनाडे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.