तेली समाजाची संघर्षाची वाटचाल म्हणजे खा. तडस - प्रकाश गिधे उपाध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पु. जि.
मी तसा चळवळीतला माणुस दत्ता सामंत यांच्या संघटेनेचा घटक. तो मिल कामगारांचा लढा लढलो आणी गिरणीबंद पडताच गावाकडे आलो. जवळ होते शुन्य उभा राहिली आणी संघर्ष सुरू केला. हा संघर्ष एकट्याचा. माझे गाव डोंगर दर्यातले सर्व साधने कमी अंगावर पाऊस घेऊन लढताना जाणवले मी एकटा आहे. परंतु माझ्या सारखे परिस्थीतीने गंजलेले माझ्या गावात माझ्या तालुक्यात, हजारो आहेत. ही सर्व मंडळी पिचत भरडत रडत आहेत. त्याच्या जगण्याची धडपडीची जाणीव कुणालाच नाही. आपन एकत्र येऊ ही ओळख ही नव्हती आणी आपन असेच पोटातले दु:ख उरात ठेवून वावरावे ही आमची ठेवन होती.
समाज संघटन कसे असावे हे खा. तडसांनी राबवले आहे. - ज्ञानेश्वर दुर्गुडे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र तैलिक तेली महासभा उ. पुणे जिल्हा.
भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी कळसू बाईचा डोंगर कपारीतून बाहेर पडलो. भाकरी किती महाग असते हे होरपळून निघाल्या नंतर समजु लागले आपण आपली भाकरी नीट मिळवली तर ती मागे राहिलेल्या साठी मिळवण्याास हातभार लावू परंतू या लढाईत कष्ट हे करीत असताना मन कुरतडत होते. कुरतडणार्या मनातला समजावून उभा राहिलो. स्वत: स्थीर होताच समाज कार्यासाठी मन ओड घेत होते.
आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 5 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
गुलामी करणारे हुशार असतात. मग ही गुलामी सामाजीक, सांस्कृतीक, आर्थिक, राजकीय असेल. सर्व प्रकारची गुलामी ही माणूस पण पाया खाली तुडवून रूबाबात असते. पुर्वी गुलांमाच्या बाजार भरत आसे. गुलामांचे कळप आसत. या कळपांचा म्होरक्या ही गुलाम आसे तो गुलाम म्होरक्या मुठीत म्हणजे बाकी सर्व पायदळी ही व्यवस्था होती. ही व्यवस्था उध्वस्त झाली पण वेगळ्या स्वरूपात स्वातंत्र्यत ही रूजवली गेली. रूजलेली फोफावली गेली आहे. स्वातंत्र्यातील पहिल्या टप्यात क्षत्रीय जाती सत्तेत होत्या.
आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 4 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
समजाचा ठेका घेऊन फिरणारे एक समाज बांधव त्यांच्यातील गुणांना मी दाद देतो. त्यांच्या धडपडीला जमेल तेवढी सोबत ही देतो. पण परवा एका प्रसंग घडला त्याचा उलगडा करतो. संभाजी म्हसे हे निवृत्त न्यायाधीश आहेत. या पुर्वी ते लाभाच्या पदावर होते. भ्रष्ट्राचाराच्या जाळ्यात अडकले म्हणुन पाय उतार व्हावे लागले जन्माने मराठा आहेत. मराठा समाजातील अंदोलनातील आहेत. मराठा अभ्यासगटाचे आहेत. त्यांना तर मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनवले. सदस्य असलेल्या प्रा. भुषण कर्डिले यांचे जरूर अभिनंदन केले. पण विविध ओबीसी संघटना पोलिस परवानगी घेऊन जात दांडगे व भ्रष्ट असलेल्या म्हसे यांचा राजीनामा आम्ही मागण्यास गेलो तेंव्हा हे समाज बांधव भेटले.
आपल्या छाताडावर नाचनार्यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!! भाग 3 मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
गत 4/5 वर्षातील वधु-वर मेळाव्यातील जहिराती, उद्घाटक, उपस्थीत मान्यावर यावर नजर टाका समाज बाह्य विशेषत: मराठा समाजातील नेत्यांची नावे पहा. याच मंडळींनी निवडणुकीत मराठा - कुणबी ही प्रमाण पत्रे आणुन निवडणूक लढवली. दोन्ही पक्षात हीच मंडळी. निवडून येणार्या मराठा हे नक्की. कारण हीच मंडळी भाजपा, सेना, काँग्रेस या पक्षा तर्फे उभी होती. अपवाद म्हणून एखादा उभा केला पण मराठा ह्या जातदांडग्या समोर तो पाला पाचोळा झाला. हा पाला पाचोळा का झाला यावर भाष्य करणे मी अनेकांच्या बाबत गुन्हेगार आहे. कारण गत वर्षी या लबाड मराठा मंडळींचे सहकार्य न घता मेळावा भरवा असे लेखन करताच महाशयांनी सांगीतले असले लिखान करू नका ? जर कराल तर ?