लोहारा ता.पाचोरा प्रतिनिधी --- पाचोरा तालुका तेली समाजा तर्फे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत तेली समाजाच्या लोहारा-कळमसरा पंचायत समिती गणातून भाजपाच्या सौ. अनिता कैलास चौधरी यांचा विजयी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष भोलाआप्पा चौधरी, जिल्हा सचिव नारायण चौधरी, पाचोरा शहराध्यक्ष बापूराव चौधरी आदींनी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ.अनिता चौधरी व ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांचा शाल,श्रीफळ,व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
पुणे - देशात प्रथमच पुणे महानगर पालिकेने एक लाख रूपये व सन्मान चिन्ह देऊन श्री संत संताजी पुरस्कार जाहीर केला होता. पहिला व सन 2017 चा पुरस्कार मनपाच्या सभागृहात 5 जानेवारी रोजी संपन्न झाला. या वेळी अध्यक्ष स्थानी महापौर श्री. प्रशाांत जगताप अध्यक्षस्थानी होते. सदरचा पुरस्कार श्री. संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार मा. उल्हासदादा पवार यांना मा. सदानंद मोरे यांच्या हास्ते देण्यात आला तेंव्हा ते म्हणाले. श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे संत तुकाराम हे अभंगा सहीत अस्तीत्वात राहिले. त्या काळातील व्यवस्थेतील सामान्यांंनी त्याग केला. म्हणुन आज तुकोबा गाथा अस्तीत्वात आहे.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 4 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
तुमचा धर्म कोणता रे. तुमचा ब्राम्हणी धर्म तुम्ही लिहीलात. या धर्माला देवाचा आदेश तुम्ही सांगता. हे जगने हेच तुमचे पुण्य. असा हा ब्राह्मणाळलेला धर्म व त्याचे ठेकेदार संत संताजींनी पायदळी तुडवले. तो तुडवून ते शांत बसले नाही तर शेकडो वर्षा साठी ब्राह्मणी पणाला एक दहशद निर्माण केली. त्या साठी त्यांनी दिलेली झापड संताजींनी हिसकावली ती पाययदळी तुडवली व ब्राह्मणी काव्यांचे त्यांना दर्शन झाले. संताजी हे माणूस होते. ते दैवी चमत्कार करणारे नव्हते ते वास्तव समजुन घेऊन. लढण्याचे ठिकाण ओळखुन. त्या शत्रुची बलस्थाने समजुन घेऊन हाल्ला करणारे होतेे. ते तसे डोळस होते म्हणुन हाल्ले करू शकले व ब्राह्मणी प्रणाली पायदळी तुडवली.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 3 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
काँग्रेस ही क्षत्रीय ब्राह्मण व समाजाची होती घटनेनुसार ओबीसी साठी 341 कलम असताना ही नेहरूंनी ते लागू केले नाही. लोकशाहीतील ही दहशदवादी कार्यवाही होती. भिती होती जर हा ओबीसी जागा झाला राजकीय जमात झाला तर आपना सर्वांची मोठी अडचण होणार. म्हणून त्यांनी ओबीसी जातींना जाणीवपुर्वक दूर ठेवले. सर्व सत्ता केंद्रे त्या त्या राज्यातील याच समाजाच्या हातात होत्या. विकास पासून हे समाज दूर ठेवले म्हणून समाज अंतरगत एक अदृश्य दरी निर्माण झाली. एकसंघ काँग्रेस मधील मतभेद यातुन एक हाती सत्ता राबवताना आणीबाणी लादली.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 2 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
परवा एका व्हॉटस ऑप ग्रुपवर लग्न जमवीण्याची शंभरी गाठण्यार्या कार्यकर्त्यानं सांगीतले आता एकच टारगेट वधुवर मेळाव्याचा व्यवसाय बंद करणार. झाले ही बातमी वधुवर मेळाव्याच्या पंढरीत पोहचली. ती बातमी पोहचताच हातावर घडी तोंडवर बोट दरबारात उभ्या असणार्या दूताने फर्मान आईकला कोणरे हा भामटा त्याला दरबारात हाजर करा. नेहमी प्रमाणे दुताने बाहेर येऊन एक डरकाळी फोडली ती डरकाळी मोबाईल मधुन महाराष्ट्रात फिरली. तेंव्हा समाजच नव्हे तर उभा सह्याद्री हादरला कारण आसे दुत हे दरबारात हात बांधुन तोंडवर बोट ठेवून असतात.