अमरावती चांदूर रेल्वेच्या पासुन दूर भुईखेड गावाच्या नावात खेड त्या मुळे गाव सर्व सुख सोईना पारख असलेले. पाऊस काळात तर कोणत्याही दिशेला चालत जावा या रस्त्यावर किमान दहा बारा मैल चिखल तुडवत जावे लागत होते यात जयराम गुल्हाणे वस्तीकरून रहात होते. वस्ती या साठी की गावात घर आहे पण शिवारात शेत नाही. त्यामुळे 1 मुली 2 मुलगे यांना मोठे करण्यासाठी ते गावात मिळेल ते काम. शिवारात मिळेल ती मजुरी करून वावरत होते. घर सावरत होते. याच झाकाळलेल्या घरात श्री. विठ्ललराव गुल्हाणे यांचा जन्म झाला. असेच झाकोळलेल्या घरात वावरत होते. मुलांना जगवलेे पाहिजे ही धडपड ती पुर्ण करण्यास दिवस अपुरा पडत होता.
तळेगांव दाभाडे दि. 13 :- सालाबादप्रमाणे दि. 11 एप्रिल रोजी तेली आळीतील मारूती मंदिर येथे हनुमान जयंती महोतसव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला.
पहाटे 5 वाजता प्रथेप्रमाणे तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष संदिप पिंगळे यांच्या हस्ते श्रींच्या मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. 5.30 ते 7 वा. या वेेळेत ह. भ. प. नितीन महाराज काकडे यांचे हनुमानजन्मावर कीर्तन झाले. संपूर्ण दिवसभर समितीच्या वतिने मंदिरामध्ये प्रसाद वितरित करण्यात आला. रात्री 8 वा. सौ. चित्रा जगनाडे, संदीप जगनाडे, पोपटभाऊ जगनाडे, तनुंजा जगनाडे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.
नाशिक - तेली समाजासाठी कार्य करणार्या श्रीग्रुप फाउंडेशनच्या वतीने अयोजित वंचितांच्या वूध-वर मेळाव्यासाठी यंदा तब्बल 400 इच्छुकांची नावनोंदणी करण्यात आली होती. त्यात आर्थिक दुर्बल, अंध, मुक - बधिर, घटस्फोटित, विधूर, विधवा व वयस्कर वधू -वरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यानिमित्ताने त्यांच्यासाठी आयुष्यभराचे ऋणानुबंध जुळण्याचा योग आला होता.
भावपुर्ण श्रद्धांजली गं. भा. जमुना दगडू राऊत
गं.भा. जमुना दगडू राऊत यांचा मंगळवार 2/4/2017 रोजी स्वर्गवास झाला.
श्री. रमेश राऊत माजी पंच तेली समाज पुणे व बिबवेवाडी येथील सोन्या चांदीचे व्यापारी यांच्या त्या मातोश्री होत.
भावपुर्ण श्रद्धांजली कै. ज्ञानेश्वर बाळकृष्ण दाभोळे
शिरवळ :- जि. सातारा येथिल प्रतिष्ठीत तेली समाज बांधव व व्यापारी व शेवट पर्यंत
तेली समाज कार्य व निष्ठा त्यांनी दाखवली