Sant Santaji Maharaj Jagnade
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
प्रा. कर्डीले, प्रबोधनातील कोहीनुर हिरा :- तेली समाज सेवकाला उच्चतम पातळीवर पेहचविण्यासाठी 30 वर्षाहून अधिक काळ ज्यांनी दिले ते म्हणजे प्रा. वसंतराव कर्डिले त्यांनी लिहीलेल संपादकीय म्हणजे अमृताची खानच ! म्हणनच त्यांना भिष्माचार्य ही संबोधतात - नोकरी सर्व करतात परंतु नोकरी करून सातत्याने समाजाशी प्रकाशमान ठेवणारे प्रा. कर्डिलेंचे ऋण समाज कधीच विसरू शकत नाही.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
डॉ. शरद महालेंचे तेली समाज सेवक :- आज महाराष्ट्रात तेली समाजसेवक मासिकाने मानाचे स्थान मिळविले आहे. यात शंका नाही 30 पानांचे सकस मजकुर तेल्यांनी तेल्यांकरवी चालविलेले समाजाची सामुदायिक मालकी अशी घटना आसलेल हे मासिक स्थिर पायावर उभे करण्यासाठी ज्या माणसाचे मोठे योगदान आहे ते म्हणजे डॉ. महाले सुमारे 35 वर्षापुर्वी निवृत्ती महाले व त्यांचे सहकारी एकत्र येऊन
याच मातीत जन्मलेले व पुणेकरांनी आपले म्हंटलेले श्री. हरिष सदाशिव देशमाने त्या काळातील पदवीधर. पुण्यात येऊन परस्थिती बरोबर दोन हात करीत कंपनीत नोकरी करू लागले. शालेय शिक्षण पुर्ण करित असताना उत्कृष्ट वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणाचा मोठा प्रभाव पडला यातुनच त्या ओघवत्या अभ्यासपुर्ण भाषा प्रभाव पडला आणि ते काही काळात भोसले यांच्या भाषणा सारखे बोलु लागले.
आज तेली समाजात सामाजिक व राजकिय जागृती दिसते त्याच्या मुळाशी तैलिक प्रबोधनकारांचे अथक प्रयत्न कारणीभुत आहेत. त्यांच्या कार्याचा फक्त परिचय करन घेणे एवढाच उद्देशय लेखाचा नाही, तर पदरमोड करन प्रसंगी आर्थिक झळ सोसुन त्यांनी सुरू ठेवलेल कार्य हे लाख मोलाचे होते, हे कार्य पोटार्थी नव्हते तर ती यज्ञात टाकतात तशी समिधा स्वरूपाची होती. नाही चिरा नाही पणती असे त्यांचे स्वरूप होते. त्यांच्या अतुलनिय कार्याची दखल घेऊन वंदन करणे हे प्रत्येक समाज बांधवाचे कर्तव्य आहे.
सातारा जिल्ह्यातील सायगांव एक छोटे गाव. तेलघाना ही या बाधवांची परंपरा तेल घाण्याला मावळत बाजु होती. तो घाणा ही मावळु लागला भुसार माल खरेदी विक्री मुळ धरता धरता कोमजु लागली. आणि जगण्याच्या धडपडी साठी काही जन गाव सोडु लागले. त्या पैकी श्री. बी. पी देशमाने हे शासकीय नोकरी निमित्त बाहेर पडले.