समस्त तेली समाजास सुचीत करण्यात येते की, झी वाहीनी वर दाखविल्या जाणार्या कन्यादान या मालीकेतील कलाकार किर्तने हे असे म्हणतात की"मी तेली नावांचा अधिकारी जो भ्रष्ट आहे त्याचा हाताखाली मी काम करणार नाही"यामुळे तेली समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा मुंबई, ठाणे विभाग व महाराष्ट्रातील समस्त तेली समाज, झी टीव्ही चॅनल व मालिकाकार यांचा जाहीर निषेध करीत आहोत.
श्री. क्षेत्र सुदुंबरे येथील मातृ संस्थेची गत महिण्यात कार्यकारणी मिटींग झाली. तेंव्हा एक भयान शोकांतीका समोर आली. शोकांतिका अशी श्री. संत संताजी जगनाडे महाराज तेली संस्था सुदुंबरे ही समाज संस्था शतक महोत्सव साजरी करण्यास काही वर्ष बाकी आहे. परंतु या मातृसंस्थे द्वारे श्री संत संताजी समाधी स्थळी मोठ्या प्रमाणात स्मृती दिन साजरा केला जातो. नेहमी प्रमाणो अध्यक्षांनी संस्था कार्यकारणी समोर फलगांव ता. हवेली जि. पुणे येथे वर्षभराचा हिशोब मांडला. खर्च सात लाखा पर्यंत. देणगी व इतर मार्गाने ४ लाख उत्पन्न आता जी काही कारणे आहेत.
डॉ सुधाकर चौधरी यांनी डॉ मेघनाथ साहा यांचे जीवनावर एक तास व्याखान दिले. कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थितीत तालुका व जिल्हा पदाधिकार्यांना डॉ मेघनाद साहा यांचा फोटो व माहिती पुस्तिका त्याच्या मार्फत वाटले व पुढच्या वर्षापासून डॉ मेघनाथ साहा यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचे सर्व पदाधिकार्यांना आवाहन केले.
हे सदर मुळात तेली मताचा आवाज आहे. हा आवाज अनेकांना खटकतो हा आवाज अनेकांना परिवर्तन करावयास लावतो. हा आवाज आत्मसंशोधन करावयास लावतो हा आवाज काही फुकट फौजदारांना समाज पातळीवर धावपळ करावयास लावतो. आणि हा आवाज हजारो बांधवांना आपला वाटतो. त्यांच्या मनातील त्यांच्या वेदनांना वाट करून देतो म्हणुन प्रत्येक महिन्याचा अंक मिळताच शेकडो समाज बांधव साथ सोबत देतात. पण हे ही आमचे मत आहे. आम्ही मांडलेले विचार हे पुर्ण सत्य आहे आसे नव्हे यातील उनीवा अजुन सत्य सांगा. मुळात या आवाजा विषयी चुक स्पष्टीकरण किंवा विरोधी मते कळवा. त्यांना प्रसिद्धी देऊ. गाव गप्पा तोंडी विरोध किंवा कुणीतरी सांगीतले म्हणुन मत सांगणे याला किंमत शुन्य कारण हा आवाज मुद्रित केलेला आहे. तेंव्हा आपल्या विचार प्रणाली प्रमाणे मते पाठवा त्याला ही प्रसिद्धी देऊ आता मुळ विषयाकडे वळु.
पेण :- येथिल तेली समाज सेविका सौ. चंपाबाई उर्फ मंगला वैरागी यांचे पनवेल येथे दि. १०/१/२०१५ रोजी हृदय विकराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. भाव, भावना व अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम असणार्या सौ. चंपाबाई यांचे जन्मग्राम पनवेल असुन येथील प्रसिद्ध पन्हाळे कुटूंबातील स्व. आबासाहेब पन्हाळे, माजी पनवेल नगरपालिका अध्यक्ष आणि माजी जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष यांची ती पुतणी होती.