श्री संताजी हितवर्धीनी संस्था
पुणे-पिंपरी चिंचवड आयोजित वधु-वर मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे तरी जास्तीत जास्त समाजबांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. कार्यक्रमाची रूपरेखा दु. 2.00 वा. श्री संताजी महाराज आरती व पूजा २.०० ते ३.०० वधु-वर परिचय सत्र ३.०० ते ४.०० इयत्ता १ ली ते १० वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा
तेली समाज बहुउद्देशिय संस्था, उमरखेड दरवर्षी तेली समाजबांधवा मार्फत राखीपौर्णिमेनिमित्त 'रक्षाबंधन झेंडा उत्सव' हा उपक्रम राबवत असते. तरी यावर्षीचे तेली समाज बांधव व समाजाचे उपाध्यक्ष - श्री. अविनाश विठ्ठलराव पोंगाणे हे रक्षाबंधन झेंडा उत्सवाचे मानकरी आहेत. यावर्षीचा झेंडा हा दिनांक १५/०८/२०१९ गुरुवार रोजी यांचे राहते घरुन सकाळी ८ वाजता झेंडा उत्सव दिंडी वसंतनगर ते हनुमान मंदीर, गांधी चौक पर्यंत निघणार आहे.
मंडल की नगर पालिका की लोकप्रिय चेअरमैन नंदिनी साहू को यंगेस्ट चेअरमैन आवार्डसे नवाजा गया । यंगेस्ट चेअरमैन आवार्ड के साथ साथ इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स में भी जगह मिली है । देश की पहली महिला नगर पालिकाध्यक्ष होने पर इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्स के चीफ एडिटर डॉ विश्वरूप राय की ओर से उपखंड अधिकारी त्रिलोकचंद मीणा ने एक समारोह में गोल्ड मेडल व प्रशंसा पत्र देकर उन्हे सम्मानित किया ।
नांदेड : दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात नांदेड तेली समाजातर्फे लावण्यात येणाऱ्या श्री नवनाथ कथेचे आयोजन तेली समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. ही कथा दोन ते ३१ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. रोज रात्री आठ वाजता नावघाट रोडवरील भाई गल्लीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कथा वाचन होत आहे. भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती समाज मंडळाच्यावतीने गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत ८० टक्क्यावरील विद्याथ्र्यांचा तसेच विविध स्पर्धा व क्षेत्रात चांगली कामगिरी करणाच्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला.