Sant Santaji Maharaj Jagnade
अमरावती दि. १४ : यावर्षी संपन्न झालेल्या शैक्षणिक सत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा गुण गौरव सोहळा अमरावती जिल्हा तैलिक समिती, भूमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर, अमरावती तर्फे रविवार दि. २५ ऑगष्ट रोजी अभियंता भवन शेगाव नाका, व्हि.एम.व्हि. रोड, अमरावती येथे सकाळी ११ वाजता आयोजित केलेला आहे.
राजगुरुनगर : रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर व संताजी महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा पांगारी येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हॅप्पी स्कूल प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेश हेडा, सचिव सुधीर येवले, अविनाश कोहिनकर, अविनाश कहाणे, संताजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव कहाणे आदी उपस्थित होते. उपसरपंच भरत बुट्टे, अविनाश कोहिनकर व अविनाश कहाणे यांनी मार्गदर्शन केले. प्रकाश घोलप यांनी सूत्रसंचालन; तर प्रा. संदीप जाधव यांनी प्रास्ताविक केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त तेली समाजातील विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि बुद्धीजिवी वर्ग, सर्व डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, प्राध्यापक, शिक्षकगण, शेतकरी बंधु, व्यवसायीक तसेच सामाजीक व राजकीय पुढारी आपणा सर्वांना २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजाची दिशा ठरविण्यासाठी रविवार दिनांक २१/०७/२०१९ रोज दुपारी १२.०० वाजता स्थळ श्री संताजी वसतीगृह, मुल रोड, चंद्रपूरला आमंत्रित करीत आहोत.
महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्यावतीने कन्या दिवस साजरा
पंढरपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, शहर कार्याध्यक्ष सागर पडगळ यांच्यावतीने दि. २१ जुलै रोजी जागतिक कन्या दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहीद कुणालगीर गोगावी अंध, अपंग निवासी शाळेमध्ये मुलांना कार्ड पेपर व मिष्टान्न भोजन देण्यात आले.
तेली समाजातील महान विभुती (भाग 7) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार पन्हाळा किल्ला पेशवाईत ओस पडला. गडावर नवनाथांपैकी गहिनाथांनी काही दिवस वास्तव्य केले. ते ठिकाणही ओस पडले. एके दिवशी गहिनीनाथांनी त्यांचे शिष्य विश्वनाथ फल्ले यांच्या स्वप्नात येऊन त्यांना गडावर जाण्याची आज्ञा दिली.