Sant Santaji Maharaj Jagnade
स.पी. उबाळे यांनी एक स्मरणीका दिली त्यावरून समजले त एक सिद्धी जानणारे ग्रहस्थ होते. मोठे पण शिष्य परंपरा या पासुन ते दुर होत. यांचे नाव ही त्यांनी कुणाला सांगीतले नवहते. मग कोणत्या गावाचे हे दूरच आहे. बाबांनी आपल्या अध्यात्मीक जोरावर अनेक बाबी सिद्ध केल्या होत्या. एक दर्शक बाबा म्हणुन अनेक जण सांगतात. त्यांचा जो प्रसिद्ध फोटो आहे त्यावरून हे तेली बाबा हे महाराष्ट्रातील नसावेत कारण त्यांचा फेटो साक्ष देतो.
सातारा शहराजवळ अरफळ नावाचे गाव आहे. या ठिकाणी काळोजी महाराजांनी समाधी घेतली आहे. अनेक दशके या ठिकाणी छोट्या प्रमाणात समाधी दिन साजरा होत होता. परंतु सातारा जिल्हा समस्त तेली समाज या संस्थेने त्यात लक्ष दिले आणि दर वर्षी जिल्हा स्तरावर समाधी सोहळा संपन्न होत आसते. या साठी संस्थेचे पदाधीकारी व मार्गदर्शक श्री जयसिंगराव दळवी लक्ष देतात. आरफळ जवळ जरंडेश्वर डोंगरावर हनुमानाचे मंदिर आहे.
संत संताजींचे पहिले भाष्याकार कै. कृष्णाजी नारायण वैरागी यांनी काही पुरावे देऊन हे सर्व स्पष्ट मांडले आहे. आज ही चाकण येथे पिड्यान पिड्या जगनाडे परिवार आहे. देहू व सुदूंबरे हे अंतर 4/5 कि.मी. आज ही आहे. संत तुकारामांनी मला नक्की काय करायचे याचे चिंतन सुदूंबरे परिसरात केले आहे. सुदंबरे हे संताजीच्या मामाचे मुळ गाव. या गावात आज ही मामांचे वशंज काळे कुटंबीय आहेत. त्यामुळे संत संताजींचा वावर जास्त करन याच ठिकाणी असावा या विचार धारेला अधीक पुष्टी मिळु शकते.
संत तुकाराम श्रिमंत घरात जन्मले होते. दुष्काळ हा पैसे कमविणयाची महान संधी आसते. त्या संधीचे सोने करण्यापेक्षा त्यांनी आपली धान्याची कोठारे दुष्काळ ग्रस्तांना दिली. याही पुढे जाऊन तुकोबांनी नक्की काय करावयाचे याचे चिंतन करून आपल्या वाट्याला येणार्या सावकारी कागदपत्रे नदीत फेकुन कर्जदारांना कर्ज मुक्त केले. या दोन गोष्टी तुकोबा व संताजी एक होण्यास कारणीभुत ठरल्या आहेत.
संत तुकारामा सह संत संताजींनी जी सामाजीक, धार्मिक क्रांती केली. त्या क्रांतीच्या इतिहासाच्या पाना पानावर संताजींचे नाव कोरले आहे. वेद, स्मृती, श्रुती, पुराणे, मिताक्षरी या हिंदु धार्मीक धर्म ग्रंथांना ही लाज वाटेल इतके प्रबळ अभंग तुकोबांचे आहेत. ही वास्तवता अनेक विद्वान मान्य करतात. आणी या वरिल धर्मग्रंथांना ही फटकारताना असेच तुकोबाचे अभंग आहेत. हे लेखन फक्त तुकोबाचे आहे. हे काही बाबतीत मान्य आहे. काही बाबतीत या साठी की पंडीतांनी मोडीचे रूपांतर देवणागीरीत करीताना काही बदल ही केलेत.