Sant Santaji Maharaj Jagnade
याप्रसंगी जाणिव पुरस्कार विजते प्रा. वसंतराव कर्डीले म्हणाले की, भारतात 6500 जाती असल्या तरी सर्व जातीचा ओबीसी हा कणा आहे . पुर्वी त्याची संख्या 52 % होती. आज ती 65 % च्या पुढे आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी सत्ताधारी होऊ शकतात. मात्र त्यांच्यात एकजुट नाही. तसेच राजकीय जागृती नाही. 1902 मध्ये छत्रपती शाहु महाराजांनी ओबीसीसाठी 50 टक्के प्रथम आरक्षण दिले. 1928 साली सायमन कमिशनपुढे श्येडुल्ड कास्टची यादी आंबेडकरांनी दिली तर श्येडुल्ड कास्टची यादी ठक्कर बाप्पांनी दिली.
पुण्यात सुरवात झालेला मेळावा नाशीकात स्थिरावला. प्रथम खिशातले गुंतवा मग खिसे भरा हा प्रोफेशनल मेळावा प्रतिष्ठेचा झाला. मेळाव्यासाठी कार्यकर्ते स्वयंभु महाराष्ट्र भर निर्माण झाले प्रसंगी व्यवसाय, नोकरी घरदार सोडून राबु लागले. आमचा भव्य दिव्य कसा या साठी स्पर्धा सुर झाली. या स्पर्धेत एक विकृती निर्माण झाली सहज जरी मेळाव्यातील उपस्थीत मंडळी पाहिली मेळाव्यातील पुस्तीका पाहिली तर ठळक नजरेत भरेल मराठा समाजाच्या देणग्यांचा पाऊस पडू लागला आहे.
वधु वर मेळाव्यातील वाटचालीची मी चिरफाड आनेक वेळा केली आहे. ही चिरफाड चुकीची आहे. हे कोणच सांगत नाही. फक्त बघुन घेऊ आमच्या विरोधात लिहीता ही आसली दमदाटी खरे लिहीले म्हणुन होते. कारण वधू-वर मेळावा ही समाज सेवा मागेच गाडुन टाकली. भव्य दिव्य पणाच्या हौसे साठी त्याला व्यवसायीक स्वरूप दिले. समाज संस्थेला नफा ठेवता हे फक्त काही आहेत पण याच्या किती तरी पट हा एक सामुदाईक पणे समाजाला खिंडीत पकडण्याचा उद्योग झाला आहे.
मुद्रण कला अस्तीत्वात आली. एक पिढी कडे हास्तलिखीते जाण्याची पद्धत धोक्यात आली. हस्तलिखीते हास्तांतरीत होताना काही बदल होत. शेकडो वर्षानी नुसता मुळ गाभा गेला ही आसे आशा वेळी मुद्रण कला आली. महात्मा फुल्यांनी त्या काळात संस्कृतीला विकृत करून जगणार्यांना फार मोठा हादरा दिला पण हार न माणनारी ब्राह्मण्य जमात आपल्या पराभवातून ही उदयाची वाट सुधारत आसते.नेमके या वेळी आनेक हस्तलिखीते मुद्रण करताना सोईचे बदल केले.
जेवणावळी, ओळखी, नाते संबंधात संपर्क, भाषण बाजी या परिघा बाहेर समाजाचे कार्यक्रम जात नाही. मानपान, प्रसिद्धीचा ढोल श्रिमंतीचे प्रदर्शन मोठे पणाची हौस मिरवणे, यातुन मतभेद ही या कार्यक्रमांची कार्यक्रम पत्रिका आसा हा कार्यक्रम संपल्यानंतर दुसर्या शहराच्या कार्यक्रमा पर्यंत शांतता. कारण इथे मी हेच आसते. कारण इथे पळवाट ठेवुन वावरणे आसते कारण इथे खरा संघर्ष कोणाबरोबर आहे. याची साधी जाणीव ही दिलेली नसते. त्यामुळे संघर्ष होत नसतो. संघर्ष नसल्यामुळे इथे समाजाच्या आणि त्यांचया ही पदरात काहीच पडत नसते.