२६ जानेवारी २०२३ आज स्वतंत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन व आपल्या जिल्ह्याचा स्वाभिमान जपलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या आपल्या समाज संस्थेचा द्वितीय २ रा वर्धापनदिन, यानिमित्ताने आपल्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या.
सोनगीर : शिरपूर (जि. धुळे) येथे तेली समाजाचे विविधोपयोगी मंगल कार्यालय उभे राहणार असून समाजधुरिणांकडून जागेची पाहणी झाली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते फलक अनावरण झाले. शिरपूर हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत आहे. अशा शहरात तेली समाजाचे मंगल कार्यालय असावे अशी समाजाची इच्छा होती.
महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळ आयोजित वधु-वर परिचय मेळावा १५ जानेवारी २०२३ साई भेट जामनेर शहर नोंदणी फार्म वधु - वर मेळावा : रविवार दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वा. स्थळ : मराठा मंगल कार्यालय, जळगांव रोड, बोहरा पेट्रोल पंपाजवळ, साई भेट जामनेर शहर ता. जामनेर जि. जळगांव
जानेफळ - मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहू द्या. कारण मुलगी शिकली तर दोन्ही घरांचा उद्धार करू शकते, असे प्रतिपादन प्रा. दिलीप डोमळे यांनी येथे केले.
संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जानेफळ येथे मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत प्रा. डोमळे बोलत होते.
शिरपूर - खान्देश तेली समाज मंडळ शिरपूर तालुका कार्यकारणीच्या वतीने शिरपूर तेली समाजाचे अध्यक्ष तथा भाजपा.चे प्रदेश उपाध्यक्ष श्री बबन रावजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली व अध्यक्ष कैलास आधार चौधरी , सचिव रवींद्र जयराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यातील तेली समाजाची खाणेसुमारी करण्यात येत आहे. त्याचे कुटुंब परिचय फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झालेली असून