शिरपूर : चौधरी समाज कष्टकरी असून सर्व समाज बांधवांनी आपल्या मुलामुलींना उच्चशिक्षित करुन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील रहावे. शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी गेल्या ३५ वर्षांपासून मी अहोरात्र काम करित आहे. नागरिकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी पूर्णपणे सार्थ ठरविला आहे. यापुढे देखील तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.
'जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे शिष्य तथा तेली समाजाचे आराध्य संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 398 व्या जयंतीचे तालूक्यातील घाटमाथा परिसरात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. अभंग व किर्तनाच्या माध्यमातून ज्ञान, कर्म व भक्तीची शिकवण देणारे संत संताजी जगनाडे महाराज महाराष्ट्रातील संत परंपरेतील महान विभूती.
सिडको : तेली समाजातर्फे त्रिमूर्ती चौक, सिडको येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा ३९८ वा जयंती उत्सव उत्साहात साजरा करून अभिवादन करण्यात आले.
श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ, सर्वांगीनी महिला मंडळ, सिडको विभाग यांच्यातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सिडको तेली समाजाचे बी. जी. चौधरी यांनी केले.
कन्नड : कन्नड येथे संताजी महाराजांची ३९९ वी जयंती शिवना नदी तीरावरील महादेव मंदिर परिसरात प्रदेश तेली महासंघ, संताजी महाराज ट्रस्ट व तिळवण तेली समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
चोपडा तेली समाजाची संस्था श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा व चोपडा तालुका महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा, संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा चोपडा अशा विविध संस्थांच्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.