श्री संत जगनाडे महाराज जयंती निमित्त मंगल कार्यालय भुमीपुजन सोहळा, उद्घाटक श्री.डॉ.शांतीलाल जी. तेली, म.रा.क. अध्यक्ष श्री. भगवान आर. ढाकरे, आर.एफ.ओ (पहिले देणगीदार) प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डॉ. आर. एन. झलवार म.रा.क.संस्थापक अध्यक्ष श्री. इंजी. प्रदिप के. ढाकरे, म.रा.क. माजी अध्यक्ष श्री. शिवाभाऊ झलवार, म. रा. क. उपाध्यक्ष श्री. राजेंद्र जी. ढाकरे सर,
धुळे. - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची बैठक ग.नं. २, जैन मंदिरासमोर, धुळे संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक महेश चौधरी यांनी केले. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
चाळीसगांव तालुका व शहर तेली समाजातर्फे तेली समाजातील वधु - वरांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या शुभाशिर्वादाने तसेच राज्यातील तमाम सर्व तेली समाज बांधवाच्या सहकार्याने. दि. ०२ मे २०२३, वार-मंगळवार या शुभ मुहूर्तावर चाळीसगांव नगरीमध्ये तब्बल १६ वर्षानंतर चाळीसगांव तालुका तेली समाजाच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
दैनंदिन कार्यक्रम : काकडा आरती : सकाळी ५ ते ६ भागवत कथा : दुपारी २ ते ५ हरिपाठ : संध्या. ५ ते ६ कीर्तन : रात्री ८ ते १० महाप्रसाद दि. २०/१२/२०२२ रोजी सकाळी १० दु. २ वा. * स्थळ : संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, तेली समाज मंगल कार्यालय, श्रीराम नगर, चोपडा जि. जळगांव. प्रारंभ मार्गशीर्ष शु. १२ सांगता मार्गशीर्ष कृ. १३ दि. ४/१२/२०२२ रविवार दि. २१/१२/२०२२
धुळे - तेली समाजाचे संत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्यात यावी असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून धुळे शहर व जिल्ह्यातील बऱ्याच शासकीय - निमशासकीय कार्यालयांमध्ये संताजी महाराजांची जयंती अथवा प्रतिमा पूजन केले जात नाही असे निदर्शनास आलेले आहे.