भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा तेली समाजाचे नेते मा. आ. श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व तेली समाजाचे ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश तेली महासंघ नंदुरबार जिल्ह्याची बैठक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे संपन्न झाली.
धुळे - तेली समाजातील मार्केट यार्ड परिसरातील स्वामीनारायण सोसायटी मधील युवक स्व. पवन सुदाम चौधरी यांचे मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे अपघाती निधन झाले होते.अपघाती निधन झाल्यानंतर वसुधारा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री व्ही.जी. पाटील साहेब यांच्याकडे खान्देश तेली समाज मंडळाने सतत पाठपुरावा करून मदत मिळवून दिली.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाचे धुळे शहराध्यक्ष श्री राजेंद्र भटू चौधरी यांचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री सुभाषजी घाटे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले असून ओबीसी महासंघामध्ये त्यांचे शहराध्यक्ष पदावरून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना उत्तर महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी देण्यात
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जेष्ठ नेते मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब दि.१२ सप्टेंबर २०२२ रोजी धुळे दौऱ्यावर येत आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पद प्रथमच तेली समाजाच्या व्यक्तीला मिळाले आहे त्यामुळे आदरणीय बावनकुळे साहेब यांचा तेली समाजाच्या वतीने भव्य सत्कार व सामाजिक संवाद कार्यक्रम आयोजित करावयाचे असल्याने सदर कार्यक्रम
धुळे - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदी माजी विज मंत्री, आमदार चंद्रशेखर बावनकळे यांची नुकतीच निवड झाली. त्यांचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित तेली समाजाच्या वतीने जाहिर सत्कार व सामाजिक संवादाचा कार्यक्रम सोमवार दि. १२ सप्टेंबर २०२२ रोजी धळे शहरात होणार आहे तरी तेली समाज बंधु - भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने करण्यात आले आहे.