कन्नड : कन्नड येथे संताजी महाराजांची ३९९ वी जयंती शिवना नदी तीरावरील महादेव मंदिर परिसरात प्रदेश तेली महासंघ, संताजी महाराज ट्रस्ट व तिळवण तेली समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
चोपडा तेली समाजाची संस्था श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा व चोपडा तालुका महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा, संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा चोपडा अशा विविध संस्थांच्या वतीने संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.
जाफराबाद आपला देश तथा महाराष्ट्र भुमी म्हणजे साधु संत थोर महात्म्यांची असुन येथे जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीने महापुरुषांनी सांगितलेल्या विचारांनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास यशस्वी जिवन जगता येते म्हणुन त्यांनी दाखविला मार्ग त्यांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे मनात उच्च ध्येय ठेवुन तथा आपण आपल्या देशाच समाजाच काहीतरी देणं लागतो या भावनेतुन जिवनाची वाटचाल करावी,
धुळे - तेली समाजाचे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उत्साहात साजरी करण्यात आली. धुळे शहरात संपूर्ण तेली समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली.
अर्धापूर - श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी केलेले कार्य प्रेरणादायी उर्जा निर्माण करणारे असून त्यांचे विचार घरा घरात पोहचावे असे आवाहन जेष्ठ पत्रकार निळकंठ मदने यांनी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दि.८ गुरुवारी रोजी व्यक्त केले आहे. युवाच्या वतीने श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सखाराम क्षीरसागर, प्रमुख वक्ते जेष्ठ पत्रकार निळकंठराव मदने प्रा. संतोष लंगडे,