इंदिरानगर दि. १४ - विद्यमान सरकारने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या सुदुंबरे येथील समाधी स्थळाला अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांच्या निधीची व नागपूर येथील संताजी महाराज आर्ट गॅलरीसाठी सहा कोटी रुपये निधीची तरतूद केली. समाज जोडो अभियान व ओबीसी लढ्यासाठी काढलेल्या रथयात्रा याचा प्रभावी परिणाम या अर्थसंकल्पात झळकला.
जळगाव : तेली समाजातर्फे शिवतीर्थ मैदानावर आयोजित तेली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धांचा नुकताच समारोप झाला. या स्पर्धेमध्ये १२ संघांनी सहभाग नोंदवला. हॉटेल अतिथी संघाने प्रथम, भारत प्रिंटर संघाने द्वितीय तर नागाई फाउंडेशन संघाने तृतीय क्रमांक मि
धुळे - समाजातील प्रत्येक महिलेने सक्षम होऊन संस्कार जोपासले पाहिजेत असे प्रतिपादन शेंदुर्णी येथील ह. भ. प. प्रा. डॉ. सौ. योगिता चौधरी यांनी केले. त्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडी आयोजित अमृत सत्कार सोहळ्यात बोलत होते. महिला दिनाचे औचित्य साधून दाता सरकार मंगल कार्यालय, धुळे येथे
खान्देश तेली समाज मंडळ धुळे महिला आघाडी आयोजित ७५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व मातांचा अमृत सन्मान सोहळा २०२३. रविवार दि. १२ मार्च २०२३ रोजी सायं. ४ वा. दाता सरकार भवन, स्वामी नारायण कॉलनी, धुळे आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.
मालेगाव महानगर तेली समाज आयोजित ज्येष्ठ समाज बांधव सत्कार सोहळ्याप्रसंगी महानगर तेली समाज अध्यक्ष रमेश उचित बोलत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तेली समाजाच्या ८५ ज्येष्ठ समाजबांधवांचा समारंभप्रसंगी पुरुषांना धोतर शर्ट पॅंट पायजमा तर महिलांना साड्या प्रदान करण्यात आल्या. व आतापर्यंत आयुष्य चांगले गेल्याबद्दल फुले देण्यात आली