धुळे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाच्या वतीने श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंती दि. ८ डिसेंबर २०१३ रोजी मोठ्या उत्साह व जल्लोषात रोष फटाके आतिषबाजीत साजरी करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव नरेंद्र भाऊ चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास भाऊ काळू चौधरी, प्रथम महापौर भगवान बापूजी कनवाळ महापौर प्रतिभा ताई चौधरी,
मुदखेड,दि.८ तहसील कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शासन निर्णयानुसार तहसील कार्यालयात तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.
अकोला - संताजी सेना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांनी विषद केलेल्या मुळ तुकारामगाथेचे लेखनिक श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात शुक्रवारी प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली.
जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील जिल्हा परिषद शाळेत आज ८ डिसेंबर रोजी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याकार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्षपदी रामेश्वर मानकर, मुख्याध्यापक सारंगधर बांगर,
धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संताजी महाराजांची ३९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीच्या निमित्ताने धुळे महानगरातील राजवाडे बँके जवळ असलेल्या गुरु शिष्य स्मारकातील श्री संताजी महाराज व तुकाराम महाराज