Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजासाठी सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्धार जालना ( प्रतिनिधी ) तेली समाज हा ओबीसी समाजातील एक महत्त्वाचा घटक असून हा समाज कष्टकरी व स्वाभिमानी समाज म्हणून ओळखल्या जातो महाराष्ट्रामध्ये हा समाज सर्वदूर विखुरलेला आहे आणि जालना शहर व ग्रामीण भागात हा समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे.
जालना- बॉम्बे फोटो स्टुडिओ चे संचालक प्रेस फोटोग्राफर सामाजिक कार्यकर्ते अतुल (राजु) बाबुराव व्यवहारे यांची तेली सेने च्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली प्रदेश अध्यक्ष डॉ. विठ्ठल रणबावरे व संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी नियुक्ती केली आहे.
धुळे : केंद्र सरकारने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, देशात जातनिहाय जनगणना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे खान्देश तेली समाज मंडळ, धुळे शहर यांनी हर्षोल्हासाने स्वागत केले आहे. खान्देश तेली समाज मंडळाच्या शहर कार्यकारिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत
धुळे- नागपूर येथील दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी अधिवेशनामध्ये जनगणना करण्याचा आग्रह माननीय महसूल मंत्री, तेली समाज ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेला मार्गदर्शन करतमा निर्देशित केले होते. व त्यानुसार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खा. रामदास त, गजानन नाना शेलार तथा महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांनी अपेक्षित असलेला
शिरपूर - खान्देश तेली समाज मंडळ शिरपूर तालुका कार्यकारणीच्या वतीने शिरपूर तालुक्यातील तेली समाजाची खाणेसुमारी करून त्याची जनसंपर्क पुस्तिका तयार करण्यात आली असून त्या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता संताजी चौक, चौधरी गल्ली, शिरपूर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.