खान्देश तेली समाज मंडळ, धुळे, राज्यस्तरीय वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार, दि. २६ नोव्हेंबर २०२३, फॉर्म जमा करणे व पाठविण्याचा पत्ता : खान्देश तेली समाज मंडळ कार्यालय, द्वारा कैलास आधार चौधरी, ग. नं. ४, घर नं. २९२६, कैलास दुग्धालय, चैनी रोड कॉर्नर, धुळे
धुळे - खान्देश तेली समाज मंडळ आयोजित खान्देशस्तरीय गुरु गौरव सोहळा रविवार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी धुळे महानगरामध्ये आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा.श्री धनंजयजी मुंडे व अकोला जिल्ह्यातील आमदार
मालेगाव डाबली येथिल प्राणघातक हल्ला केल्याबद्दल कारवाईसाठी डॉ. सुभाष भामरे व पालकमंत्री दादाभाऊ भुसे यांना निवेदन देण्यात आली. रितेश भाऊसाहेब निकम याने व त्याच्या साथीदारांनी रविद्र शंकर चौधरी यावर लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला केला. तलावावरील मुरुम कुठे वाहत आहे असे विचारले असता रितेश व त्याच्या साथीदारांनी रविद्रवर हल्ला चढवला.
धुळे - महिलांनी सक्षम बनून स्वसंरक्षणा बरोबरच समाजाच्या रक्षणासाठी पुढे यावे असे प्रतिपादन धुळे महापालिकेच्या महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळ आयोजित कराटे प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. साक्री रोड वरील कल्याण भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एस. के. चौधरीसर हे होते
धुळे, - तैलिक महासभेच्या महिला आघाडीतर्फे तेली समाजातील श्रमकरी, कष्टकरी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, पोलीस, आदि महिलांचा नारी शक्ती सन्मान व महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रांतिक तैलिक महासभा प्रदेश कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार तर प्रदेश महासचिव