Sant Santaji Maharaj Jagnade
परभणी. धुळे जिल्हातील दोंडाईचा येथील शाळेत एका पाच वर्षाच्या बालीकेवर दि 8 फेब्रुवारी 2018 रोजी ती बालीका शाळेत गेली आसता एका व्यक्ती ने तीला आमीष देत तीच्यावर अत्याचार केला. त्रासाबाबद तीने आईला सांगितले. त्यांनी डाँक्टर कडे नेले आसता तीच्यावर अत्याचार झाल्याचे चे ऊघड झाले.
घोटी यथे तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा येथे एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला. त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा घोटी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.
शिंदखेडा, दि.१९ (प्रतिनिधी) - दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे बालवाडीत शिकणाच्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाच्या नराधमास व त्यास पाठीशी घालणाच्या लोकांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा मोर्चा काढून रास्तारोकोचा इशारा शिंदखेडा तेली समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.
दोंडाईचा नूतन विद्यालयात बालिकेवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडली. या घटनेचा पिंपळनेर येथे तेली समाजातर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला. नराधमास व दबाव तंत्र वापरणा-यांना त्वरीत अटक करून कठोर शासन होईल, अशी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिंडोरी खेडगाव येथे समस्त तेली समाज बांधव ,संताजी युवक प्रतिष्टान,संताजी महिला मंडळ यांच्या उपस्तीत धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाज्याचा पाच वर्षीय बालिकेवर एका नराधमाणे अत्याचार केला याच्या निषेधार्थ खेडगाव येथे मूक मोर्चा काढून खेडगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले