Sant Santaji Maharaj Jagnade
खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगांव, ता. जि. जळगांव
कार्यालय मनोज विश्वनाथ पाटील, 185, पोलन पेठ, जुना कापड बाजार, जळगाव
वधु - वर पालक सुची 2017 वर्ष 1 ले
30 सप़्टेंबर 2017 नंबर आलेले फॉर्म सुचीत प्रकाशित केले जाणार नाहीत याची नोंद घ़्यावी व मागील सुचना वाचुन फॉर्म भरावा.
परतूर ( जालना ) :- पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जुना मोंढा भागातील मुख्य चौकास संत सजगनाडे महाराजांचे नाव देण्याचा प्रस्तावर मान्य करण्यात आला. नगरसेविका सोनाली उनमुखे, राजेश खंडेलवाल यांनी तशी मागणी केली होती. ऐन वेळच्या विषयांमध्ये अर्ज सादर करून प्रस्ताव देण्यात आला. सभागृहात प्रस्ताव वाचून दाखवल्यानंतर सदरील चौकास संताजी महाराज जगनाडे यांचे नाव देण्यास सर्वानुमते प्रस्ताव मान्य केला.
श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशिय संस्था, जळगाव
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. 16/12/2017 शनिवार दि. 17/12/2017 रविवार रोजी कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व समज बांधवांनी व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आसे आव्हान करण्यात आले आहे.
![]()
सुदुंबरे - श्री. संत संताजी समाधी मंदिरातील दान पेटी चोरट्यांनी पळवुन नेहली आहे. येथे शाळा आहे. संस्थेचे कर्मचारी आहेत. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदयाचे हे एक अधीष्ठान आहे. कोट्यावधी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. असे असतानाही येथे चोरी होऊन दहा दिवस उलटले तरी पोलिस यंत्रणा केस नोंदवून घेण्या पलिकडे काहीच करीत नाही. ही बाब येथे समोर येते. संस्थेचे अध्यक्ष बदलून चार महिने झालेत. नविन अध्यक्षांना ही कल्पना दिली गेली नाही.
जळगांव - जळगाव जिल्हा संघटीत करून जिल्हास्तरावर संस्था भक्कम उभी करणारे श्री. आर. टी. अण्णा चौधरी यांचे चिरंजीव कै. अनिल चौधरी यांचे अल्प अजाराने निधन झाले ते 45 वर्षांचे होते.