Sant Santaji Maharaj Jagnade
चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर आयोजित गुणवंत गौरव समारंभ २०२३ तेली समाजातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वर्ष २०२२ - २०२३ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन स्थळ - श्री संताजी वस्तीगृह, मुल रोड, रेंजर कॉलेज समोर, चंद्रपूर, रविवार दि. १३ ऑगस्ट २०२३ ला दुपारी २.०० वाजता करण्यात आलेला आहे.
गडचिरोली : संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने इयत्ता दहावीत ८० टक्के व बारावीत ७५ टक्के त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच एमपीएससी, यूपीएससी व पीएचडी, एमबीबीएस, नवोदय, स्कॉलरशिप उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार कार्यक्रम रविवार ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी
समर्पण फाऊंडेशन, नवी मुंबई यांच्या सौजन्याने १० (दहावी) उत्तीर्ण गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांकरिता आर्थिक शिष्यवृत्ती योजना समर्पण फाऊंडेशनच्या “श्री. संताजी महाराज शिष्यवृत्ती” योजनेनुसार समाजातील दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांकरिता १० वी च्या बोर्डाच्या मार्च २०२३ मध्ये झालेल्या परिक्षेत ८० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता व
सर्व वारकरी समाज, बांधव, देणगीदार व अन्नदाते, यांच्या सहकार्यातुन पंढरपूर येथील संस्थेच्या मालकीच्या जागेवर नियोजीत श्री संताजी सांस्कृतिक भवन इमारतीचा भुमिपूजन समारंभ आषाढ शु. १० शके १९४५ बुधवार दिनांक २८/६/२०१३ रोजी सकाळी ११-०० वाजता करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
पुणे, ता. ६ : लोणी काळभोर येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावे 'स्कील सेंटर' उभारण्याची मागणी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पुणे शहर शाखेतर्फे निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली. पुण्यात तेली समाजाचे सुमारे लाख नागरिक राहत असून, त्यांना या सेंटरचा लाभ घेता येईल, अशी अपेक्षा शहराध्यक्ष गणेश चव्हाण यांनी व्यक्त केली.