नागपुर. संताजी कल्याणकारी मंडल व संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा नियोजित संत शिरोमणी संत जगनाडे महाराज पुण्यतिति के अवसर पर भव्य रक्तदान, स्वास्थ्य जांच शिविर, नेत्ररोग चिकित्सा व चष्मा वितरण के साथ ही समाज प्रबोधन का भव्य कार्यक्रम भगवती सभागृह त्रिमूर्ती नगर में संपन्न हुआ. कार्यक्रम के अध्यक्षता जवाहर विद्यार्थी गृह के अध्यक्ष रमेश गिरडे ने की.
सोनगीर : शिरपूर (जि. धुळे) येथे तेली समाजाचे विविधोपयोगी मंगल कार्यालय उभे राहणार असून समाजधुरिणांकडून जागेची पाहणी झाली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते फलक अनावरण झाले. शिरपूर हे झपाट्याने विकसित होणारे शहर असून मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत आहे. अशा शहरात तेली समाजाचे मंगल कार्यालय असावे अशी समाजाची इच्छा होती.
चांदवड : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित नाशिक विभागीय पदाधिकारी बैठकीत चांदवड तालुक्यातील व शहरातील विविध आघाड्यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार,
श्री संताजी सेवा मंडळ, पुणे, धायरी, वडगाव, सिंहगड परिसर प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार, दि. ८ जानेवारी २०२३ रोजी श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. तरी या प्रसंगी सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती करण्यात आलेली आहे.
जानेफळ - मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहू द्या. कारण मुलगी शिकली तर दोन्ही घरांचा उद्धार करू शकते, असे प्रतिपादन प्रा. दिलीप डोमळे यांनी येथे केले.
संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जानेफळ येथे मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत प्रा. डोमळे बोलत होते.