Sant Santaji Maharaj Jagnade
शुक्रवार दिनांक ८ डीसेंबर २०२३ रोजी श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती सकाळी साडे अकरा (११-३०) वाजता रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संपर्क कार्यालय, डाॕ.पंकज बंदरकर यांचे घर, तेली आळी रत्नागिरी येथे रत्नागिरी तालुका व जिल्ह्याच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तेली समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या संताजी महाराजांच्या जयंतीला
प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने विविध कार्यक्रमांनी संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरीअहमदनगर- संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीनुसार तेली समाजाची वाटचाल सुरू आहे. प्रत्येकाने एकमेकांशी आपुलकीने व प्रेमाने वागावे. श्री संताजी महाराजांनी जगद्गुरु संत तुकोबाराय यांची बुडालेली गाथा पुन्हा तंतोतंत लेखन करून समाजापुढे आणली.
खामगाव - संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. संत श्री जगनाडे महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले.
वालसावंगी येथे शुक्रवारी (ता.०८) तारखेला सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
मुदखेड,दि.८ तहसील कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शासन निर्णयानुसार तहसील कार्यालयात तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.