Sant Santaji Maharaj Jagnade
मौदा . संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा, मौदा तालुकाध्यक्ष कामिनी प्रल्हाद हटवार यांच्या संकल्पनेतून अरोली येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संकटांना न डगमगता धैर्याने तोंड देणाऱ्या मंगला खरवडे, लता जुमडे, रोशनी हटवार या महिलांचा कामिनी हटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उमरेड : महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा उमरेड तथा नगर परिषद उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने प. दीनदयाल नाट्य सभागृह, उमरेड येथे दिनांक ११ मार्चला विविध क्षेत्रातील व विविध समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या (५१) महिलांना सन्मानित करण्यात आले.
संताजी संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडीचे जागतिक महिला दिन 11/03/2023 दुपारी 1 वाजता संपन्न. नामदेवराव रोकडे संताजी सभागृह गरोबा मैदान छापरू नगर नागपूर येथे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी नागपूर शहर तर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीरजागतिक महिला दिनाचे औपचारिक साधून आपल्या भागातील महिला पुरुष वृद्ध तसेच लहान मुलं यांच्याकरिता भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिबिरामध्ये रक्त तपासणी औषधी मोफत मध्ये देण्यात येतील आणि शिबिराच्या नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा ही विनंती.
खान्देश तेली समाज मंडळ धुळे महिला आघाडी आयोजित ७५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व मातांचा अमृत सन्मान सोहळा २०२३. रविवार दि. १२ मार्च २०२३ रोजी सायं. ४ वा. दाता सरकार भवन, स्वामी नारायण कॉलनी, धुळे आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.