Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्र राज्य पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळ आयोजीत भव्यदिव्य सामुहिक विवाह सोहळा - २०२३ पद्मवंशीय तेली समाजाचा भव्यदिव्य सामुहिक विवाह सोहळा श्री.गोविंद समर्थांच्या पावन भुमीत श्रीक्षेत्र प्रति पंढरपुर पिंपळगाव (हरे.) ता.पाचोरा जि.जळगांव येथे दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी दु. १.०५ मि. संपन्न होत आहे. या मंगलमय कार्यक्रमास
दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती
असे ज्यांना भेटताक्षणी म्हणावेसे वाटत होते, अशा दिव्यमूर्ती, प्रेममूर्ती, करुणा मूर्ती, स्व. श्रद्धेय आदरणीय आदर्श माता पर्वताआईची समर्पित जीवन यात्रेची सांगता गेल्या ३१ जानेवारी २०२३ या दिवशी निसर्ग नियमाप्रमाणे, वृद्धापकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी झाली.
श्री संताजी प्रतिष्ठान नगररोड, पुणे -१४ मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकु, तिळगुळ वाटप व विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम. मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ व हळदी-कुंकू तसेच विद्यार्थी गुणगौरव समारंभ आपल्या संस्थेतर्फे शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी आपली तेली समाज बांध्वांची उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.
दिनांक 28/1/2023 ला जवाहर विध्यार्थी गृह, संत्रा नगरी व मेट्रो सिटी नागपूर येथे आयोजित करण्यात आले. विविध वयोगटाच्या मुली व महिलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. सौ. पूजा कांबळे यांनी साकारलेली श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची हुबेहू रांगोळीने विशेष लक्ष वेधले, कार्यक्रमात नृत्य, लावणी , पोवाडे, उखाणे, गाणे, गेम्स व अन्य आयोजनामुळे महिलांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला
औरंगाबाद जिल्हा तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२३ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ सकाळी ९ ते सां. ६.०० वा. रविवार दि. २६ फेब्रुवारी २०२३ मेळाव्याचे ठिकाण : दौलत लॉन्स, जालना रोड, चिकलठाणा, (छ.संभाजीनगर) औरंगाबाद. संपर्कासाठी व कार्यालय पत्ता कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सायं. ८.०० पर्यंत मिटकर सुपर शॉपी क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या बाजूला मो. ९७६६४२२३५० विशाल हार्डवेअर पुंडलिक नगर रोड, हनुमान चौक औरंगाबाद