श्री संत संताजी युवा संघटना वैजापूरची उदिष्ट्ये :
श्री संत संताजी युवा संघटना वैजापूर, ता. वैजापूर जि. औरंगाबाद-४२३७०१
युवकांना एकत्रित करून सामाजिक समाजसेवायुक्त उपक्रम राबविणे
युवकांना समाजकार्यात समाविष्ट करून त्यांच्यात समाजाबद्दल प्रेम निर्माण करणे
दि.1 वैजापूर जि.औरंगाबाद - श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त विनम्र अभिवादन व कार्यक्रमांचे आयोजन शिवराई रोड, वैजापूर येथे करण्यात आले. ह. भ. प. श्री. प्रकाश महाराज कदम यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.यानंतर ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज मधाने (शिवुर) यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. यानंतर दोन्ही महाराजांचे पुजन श्री. विलास गोपीनाथ भुजबळ व सौ. शोभाताई भुजबळ,
कोपरगाव - संत जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानले होते. संत जगनाडे महाराज जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते व चौदा टाळकऱ्यांपैकी एक विश्वासू टाळकरी होते. संत जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अनमोल साठा जगाला दिला असल्याचे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.
वरणगाव : वरणगाव येथे समस्त तेली समाजाचे आराध्य दैवत संत तुकाराम महाराजांच्या मुळ गाथेचे लेखक श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ता दींडी सोहळा आयोजित करण्यात आला होता . तसेच श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.
सोनगीर : मुडावद, ता. शिंदखेडा येथील ग्रामपंचायतीत संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सरपंच भारती चौधरी व उपसरपंच सुनीता मालचे यांच्या हस्ते जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले. यावेळी तेली समाजाचे कार्यकर्ते सुरेंद्र चौधरी व तेली समाज बांधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.