सांगली जिल्हा लिंगायत तेली समाज अंतर्गत मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाज यांच्या संयुक्त विद्यमाने भिव्य राज्यव्यापी लिंगायत तेली समाज वधू-वर मेळावा २०२२ महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील ज्यांना बंधू-भगिनींना यंदा "कर्तव्य आहे. अशा इच्छुकाकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे तरी आपण सर्वजण उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा.
नि:शुल्क नोंदणी- जवाहर विद्यार्थी गृह नागपूर संस्थेतर्फे तेली समाजाच्या विवाहयोग्य युवक-युवतींचे परिचय ( वधु - वर परिचय ) असलेल्या 'सुयोग' विदर्भ स्तरीय पुस्तकांसाठी नावे नोंदणी नि:शुल्क सुरू झालेली आहे. दररोज कार्यालयीन वेळेत ( ११ ते ६ ) सिव्हिल लाइन्स व नंदनवन येथे पासपोर्ट साइझ 02 फोटो जोडून फॉर्म भरून दि.10-05-22 पर्यंत दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेतानी Pdf मध्ये दिलेला फार्म भरुन पाठवून द्यावा.
सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या तेली समाजाने एकत्र यावे. एकजुट झाल्याशिवाय त्मचीआमची ताकद वाहणार नाही. एकट होईल तेव्हाच आपली प्रगती होईल असे प्रतिपादन संताजी महाराज देवस्थान, सुदंबरे, जि. पुणेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी केले.
औरंगाबाद तेली समाज वधु-वर परिचय मेळावा लग्नगाठ - २०२२ रविवार दि.२२ मे २०२२ सकाळी १०.०० वा. संपर्क कार्यालयः एन-९ टाऊन सेंटर, अक्षयदिप प्लाझा, सिडको जालना रोड, औरंगाबाद मो.९९२२२३४६२१ ई - मेल - ganeshpawar99223@gmail.com
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने रविवार, दि. १० एप्रिल रोजी करंजे नाका परिसरातील महासैनिक भवन येथे राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.