विहामांडवा येथील सरस्वती सार्वजनिक वाचनालयात संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांची 399 जयंती करण्यात आली. साजरी जयंती निमित्त संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी विहामांडवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर, अंगद भिंगारे महाराज यानी संत शिरोमणी जगनाडे ची महती सांगितली.
वालसावंगी येथे शुक्रवारी (ता.०८) तारखेला सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिर येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
मुदखेड,दि.८ तहसील कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शासन निर्णयानुसार तहसील कार्यालयात तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.
सावरगाव : येथील ग्रामपंचायतीमध्ये श्री संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपसरपंच राजू गिरडकर, सदस्य मंगेश दाढे, एकनाथ रेवतकर, विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी अजय नितनवरे, शेषराव फुके, सुरेश जयस्वाल, पंजाब हिरुडकर, हिंमत नखाते
अकोला - संताजी सेना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांनी विषद केलेल्या मुळ तुकारामगाथेचे लेखनिक श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त अकोला शहरात शुक्रवारी प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली.