नगर - शासन निर्णयानुसार राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार महानगरपालिकेने जाहीर केल्यानुसार 'तेलीखुंट' परिसराचे नाव बदलून 'श्री संत संताजी महाराज पथ' करण्यात यावे,
कार्तिक पौर्णिमा महोत्सव ३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या दरम्यान आपल्या मिठगवाणे तेली समाज शोभा यात्रा निमित्ताने रविवार दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ७.३० ते रात्रौ १०.३० यावेळेत तेली समाजाचा मिठगवाणे शिवाजी चौक ते अंजनेश्वर मंदिर येथे ७.३० ते ८.३० अशी भव्यदिव्य शोभा यात्रा आणि त्यानंतर अंजनेश्वर मंदिरामधील पालखी उत्सव ९.०० ते १०.०० या वेळेत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पालखी सोहळा होणार आहे.
औरंगाबाद शहर आणि परिसरात गेल्या २५ वर्षापासून आसामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक , धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात अनेकांगी समाजोपयोगी उपक्रम राबवणारे व्यक्तिमत्व म्हणून कचरू कारभारी वेळंजकर यांनी आगळी ओळख निर्माण केली आहे.
श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था गंजीपेठ, नागपूर ही संस्था समाज कार्याकरिता समाजात नावाजलेली असून विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम प्राधान्याने राबविले जातात. हुशार होतकरु गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या संस्थेकडून दरवर्षी नियमितपणे दिली जाते. विद्यार्थी, पालक, माता- पालक शिबिरात ओबीसीआरक्षण शिष्यवृत्ती, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय पदे इ. विविध विषयावर प्रबोधन करून व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो.
धुळे - खान्देश तेली समाज मंडळ धुळे आयोजित राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी स्व. दत्तात्रय लालचंद महाले नगर, पाडवी नूतन विद्यालयाचे मैदान, स्टेशन रोड, धुळे या ठिकाणी सकाळी १० वाजता संपन्न होणार असून या मेळाव्यासाठी दीड हजार वधू-वरांची नोंदणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यभरातून तसेच शेजारचे मध्य प्रदेश, गुजरात राज्या मधून