देवगड तालुक्यातील लिंगडाळ गावामध्ये श्री दिगंबर वरेरकर यांच्या घरानजीक हे स्वयंभू श्री लिंगेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची पूजाअर्चा वरेरकर बंधू करतात.
कोर्ले येथील श्री विठ्ठलादेवी देवीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराचे प्रमुख विश्वस्त विश्वनाथ खानविलकर आहेत.
देवगड तालुक्यातील जामसंडे वेळवाडी (मळई) येथील तेली समाज बांधवांचे जामसंडे - विजयदुर्ग सागरी महामार्गावर जामसंडेपासून सुमारे ४ किमी अंतरावर श्री मेळेकर देवस्थान आहे. जामसंडे गावच्या बारा रहाटीमध्ये पूर्वी तेली हा मानकरी होता.
देवगड तालुक्यातील वाडा सडेवाडी येथील श्री आप्पाजी वाडेकर यांनी बांधलेले हे हनुमान मंदिर आहे. या मंदिरामध्ये हनुमान जयंतीला मोठा उत्सव असतो.
श्री. बाळकृष्ण दाजी किंजवडेकऱ्यांचे किंजवडे - लिंगडाळ मार्गावर गणेशमंदिर भाविकांच्या भक्तिभावाला 'नवतेज' देते.