Sant Santaji Maharaj Jagnade
प्रतिवर्षी प्रमाणे श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र यांच्यातर्फे श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री राममंदिर कॉटनग्रीन ते विठ्ठल मंदिर वडाळा पालखीचे रविवार दिनांक ७/०१/२०२४ रोजी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संताजी जगनाडे महाराज महासंघ मुंबई यांच्यावतीने संताजी जगनाडे महाराज चौक लालबाग येथे
अंबड शहरात श्रीसंत संताजी महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त सर्व तेली समाज बांधवांच्या वतीने ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी समाजातील महिला-पुरूष व लहान मुलांचा सहभाग होता.
दिंद्रुड दि.८ माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शुक्रवारी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत परंपरेत जगनाडे महाराजांचे कार्य अलौकिक आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवली गेली. त्यातील सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोदत होते
फुलंब्री येथे आज श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी तेली समाज सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच तेली गल्ली येथे असलेला संताजी चौक येथे देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जालना येथील सकल तेली समाजातर्फे काद्राबाद भागात सामाजिक सभागृहात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. भोकरदन नाका परिसरात संताजी चौकात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि भाजपाचे मा. गटनेते अशोक पांगारकर यांच्या पाठपुराव्यातून मंजूर करण्यात आलेल्या