पनवेल : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग व जय संताजी तेली समाज मंडळ, पनवेल यांच्या वतीने टपाल नाका येथील श्री शनैश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ५१ जणांनी रक्तदान केले. या सर्वांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
प्रतिवर्षीप्रमाणे श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची ३३४ वी पुण्यतिथी मार्गशिर्ष शनिवार, दि. ०१/०१/२०२२ रोजी त्या निमित्ताने सर्व तेली समाज बांधवाच्या वतीने खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची रुपरेषा * बुधवार, दि. २९/१२/२०२१ शिवलिलामृत पारायण स. ५ ते ७ वा. शुक्रवार, दि. ३१/१२/२०२१ रोजी सायंकाळी ७ वा. हरिपाठ
कोल्हापूर लिंगायत तेली समाज कोल्हापूर (ट्रस्ट) व श्री बसवेश्वर को-ऑप.क्रेडिट सोसा. लि; कोल्हापूर. यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्यव्यापी २२ वा वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजातील सर्व समाजबांधव, बंधू-भगिनींना कळविणेस आनंद होतो की, गंदा आम्ही करवीर काशी श्रीअंबाबाई सानिध्यात शाहू महाराज यांचे कर्मभूमीत, केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे.
श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 28 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यातून व्यवसायिक शिक्षण घेणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना 12 लाख रुपये पर्यंत रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 500 विद्यार्थ्यांना 1 कोटी, 35 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
पनवेल, दि. 8 :- महापालिका मुख्यालयात आज श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे इतर अधिकारी-कर्मचारी आणि तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.