Sant Santaji Maharaj Jagnade
सालाबाद प्रमाणे यावर्षीही २६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे खजिनदार श्री किसन भाऊसाहेब करडिले यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा सकाळी ०८.०० वाजता पार पाडण्यात येईल. तसेच सर्व महिला भगिनींसाठी सायंकाळी ४.०० वाजता हळदी-कुकू समारंभ आयोजित केला आहे. तरी सर्व समाज बांधव व महिला भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच आपण सर्वांनी सहकुटु्ंब उपस्थित राहुन सायंकाळी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा
शिंगणापुर तिळवणतेली समाज व संताजी तरूण मंडळ व समस्त ग्रामस्थ राजुर यांच्या पाच दिवसांच्या राजूहुन शनि शिंगणापूरला निघालेल्या पायी तेल कावड दिंडी प्रवासाच्या दिंडींचे स्वागत सोनई येथे भव्य मिरवणुकीन स्वागत करण्यात आले. तेल कापड पायी यात्रा ही अखंडपणे चालु राहुन तरुणांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रोत्साहन द्यावे व सहभाग घेण्याचे आवाहन शनि-शिंगनापुरचे पो.नि. कैलास देशमाने यांनी केले व पुढील शनी-शिंगणापुर ते राजुर प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
रमेश भोज, विश्वस्त तेली समाज पुणे मो. नं. 9604767068
लग्न झाल्यानंतर वर्षाच्या आतच दोघा नवरा - बायको यांचे पटत नाही दोघांच्या आवडी निवडी फारच वेगळ्या असल्याकारणाने त्यांचे विचारही साहजीक वेगळेच असणार. त्यामुळे रोजच कटकट, वाद, कामावर येता जाता वाद आगदी किरकोळ कारणावरून भांडण. त्यामुळे दोघेही विचार करतात की पुढे पुर्ण आयुष्यभर वाद घालण्यापेक्षा वेळीच आपण वेगळे झालेलो बर म्हणुन दोघेही एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्यास तयार होतात. अशा प्रकारे घटस्फोट घेणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हि संख्या कमी करणे फार गरजेचे होऊन बसले आहे.
श्री. भगवान बागूल (पत्रकार), मालेगाव (नाशिक ) मो. 9823340409
समाजजीवनात व राष्ट्रजीवनात काही आदर्श हे एैतिहासिक व आदर्शवत असतात. अनेक पिढ्या त्यापासून प्रेरणा घेतात एवढेच नव्हे तर ते इतिहासाचे साक्षीदार असता. यातील ज्या व्यक्तिंमुळे हा इतिहास घडतो त्या व्यक्ती आदराचा विषय बनतात तेली समाजाच्या उत्कर्षासाठी झटणारी मुंबईची शनेश्वर फाऊंडेशन ही संस्था समाजआदरास विषय बनली आहे. त्या संस्थेच्या व्यक्ति म्हणजे तेल्यांचे बाबा आमटे बनले असे म्हंटले तर वावगे होऊ नये. असे काय आहे. या संस्थेच्या कार्याबाबत ? त्या कार्यापासुन तुम्ही आम्ही काय बोध घेणार ? प्रगतिच्या अनेकं योजने दुर असलेल्या तेली समाजाला अशा संस्थांचे कार्य दिशा देणारे ठरले. अशा अनेक संस्थांच्या उभारणीने प्रगत समाजाच्या समान पातळीवर नेण्यास मदत होईल.
इतिहास घडवीणारा तेली स माज व भवानी मातोचा पलंग ( भाग 2 )
![]()
नगर जवळच्या बुर्हानगर येथे भवानी मातेचे मंदिर आहे. या मंदिरातून निघालेल्या पालखीत भवानी माता तुळजापूर येथे शिलांगनच्या उल्सवात बसलेली आसते. हा मान भगत घराण्याला शेकडो वर्ष मिळतआहे. पुराणात नुसती वांगी आसतात अशी एक म्हण आहे. इतिहासाचार्य राजवाडे आपल्या संशोधनात म्हणतात व्यास हा एक अतीबुद्धीमान माणुस होता. त्याने त्या वेळच्या कथा, त्या वेळच्या दंतकथा, त्यावेळच्या लोककथा, या पिढी पासुन त्या पिढीकडे हस्तांतरीत झालेल्या कथा. संग्रहीत केल्या आणी त्यांना आपल्या विचार प्रणाली प्रमाणे, बदलत्या काळा प्रमाणे आकार देऊन लेखन केले. आणी यांच ग्रंथावर उभा देश व्यापला याचा आर्थ एकच व्यासानी त्यातून हवे ते बाजुला सारून आपली हुकमत निर्माण केली.