साई संताजी प्रतिष्ठान अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्यावतीने शिर्डी येथे दि. १२ ऑक्टोबर रोजी मोफत वधू-वर पालक परिचय व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असून सदर सोहळ्यासाठी समाजातील वधू-वरांनी नाव नोंदणीचे आवाहन महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. विद्याताई करपे यांनी केले आहे.वृदावन मंगल कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
साई संताजी प्रतिष्ठान शिर्डी अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा शनिवार दिनांक 12-10-2019 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सिद्धी संकल्प लॉन्स मंगल कार्यालय नगर मनमाड हायवे साकुरी तालुका राहता शिर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर वधू-वर पालक परिचय मेळावा पूर्णतः मोफत आहे. संपर्क कार्यालय व फॉर्म शिकण्याचा पत्ता साई संताजी प्रतिष्ठान होटेल एक्झिक्युटिवे इंन युनियन बँकेच्या वर गोंदकर पेट्रोल पंपासमोर नगर मनमाड हायवे शिर्डी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर 9890279008, 9422191544, 7972147109
साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साई संताजी प्रतिष्ठाण अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य वधु - वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा. शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2019 रोजी संपन्न होणार आहे. सर्व समाज बांधवांनी आपल्या वधु-वरांचा सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्ह्यातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात प्रथमच लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था (ट्रस्ट) आयोजित, भव्य राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा
लिंगायत तेली समाजातील सर्व समाज बांधवांना, भगिनींना कळविण्यात येत आहे की, शहरात प्रथमच लिंगायत तेली राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा आम्ही आपल्यासाठी घेण्यामागचा प्रमुख हेतू असा की, भरपूर ठिकाणाहून आलेली मागणी, समाजातील विविध मान्यवरांनी कराड मध्ये एकदा तरी वधू-वर पालक मेळावा व्हावा अशी मागणी केली.
रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ, रत्नागिरी जिल्हा वधु-वर सुचक मंडळ आयोजित
राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा 2019
सहसंयोजक जिल्हा सेवा संघश रत्नागिरी तालुका उपशाखा, संताजी जगनाडे मंदिर ट्रस्ट, रत्नागिरी
शनिवार दिनांक 9 फेब्रुवारी 2019 रोजी, वेळ सकाळी 9.30 ते 5.30 वाजेपर्यंत
मेळावा स्थळ : श्री बालाजी मंगल कार्यालय, शांतीनगर स्टॉप जवळ, युवराज फिटनेस जिमसमोर, नाचणे रोड, रत्नागिरी.