Sant Santaji Maharaj Jagnade
मालेगाव शहरातील तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संताजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त मालेगाव येथील सेलू फाटा येथे श्री संताजी महाराज नगर च्या नाम फलकाचे अनावरण समाजातील जेष्ठ कार्यकर्ते सिताराम निंबाजी काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवरासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आधुनिकतेची कास धरून मेळाव्याचे आयोजनछत्रपती संभाजीनगर, सकल तेली समाज व तेली सेनेच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राज्यस्तरीय तेली समाज वधू वर संपर्क मेळावा नुकताच पार पडला. यावेळी राज्यभरातून विवाह इच्छुक वधू वरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, सदरिल मेळाव्यात ३७५ तरुण तरुणींनी नाव नोंदणी केली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
फुलगाव (ता. हवेली) येथील मुख्य चौकास संत संताजी जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे लेखन आणि रक्षण करण्याचे काम त्यांनी केले होते. तसेच तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांमध्ये मुख्य टाळकरी म्हणून त्यांचा समावेश होता. त्यांच्या ३९९ व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने
हडपसर : श्री संताजी प्रतिष्ठानच्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती संताजी भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस वधू-वर सूचक केंद्राचे अध्यक्ष सूर्यकांत मेढेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. प्रा. शंकरराव पवार यांनी प्रास्ताविक केले.
चाकण : ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या संत संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. चाकण (ता. खेड) येथे संत संताजी महाराज जगनाडे यांचे जन्मस्थान आहे. जयंती उत्सवानिमित्ताने सकाळी साडेसहा वाजता संताजी महाराजांच्या जन्मस्थळी प्रतिमा पूजन करण्यात आले. साडेआठ वाजता रामचंद्र महाराज धाडगे यांचे संताजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रवचन झाले