Sant Santaji Maharaj Jagnade
प्रतिवर्ष के अनुसार इस वर्ष भी भारतीय तैलिक साहू राठौर महासभा के द्वारा विद्यार्थी गौरव केरियर गाइडेंस व अतिथि स्वागत समारोह का आयोजन रविवार दिनांक 7 जुलाई 2019 को शाम 4:30 बजे से 9:30 बजे तक ठाकुर हॉल डोंबिवली में किया गया है । जिसमें इस वर्ष 10वीं और 12वीं में उत्तीर्ण विद्यार्थियों का स्वागत सम्मान व प्रोत्साहित करना व बुद्धिजीवी समाजसेवी द्वारा उनको मार्गदर्शन किया जाएगा ।
दिनांक 23 जून 2019 रोजी, 8 डिसेंबर 2019 रोजी होणार्या तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती निमित्त पूर्वनियोजित बैठक संत नगरी शेगाव येथे घेण्यात आली, तरी सर्व संताजीभक्तजण उपस्थित होते, संताजी नवयुवक मंडळ अध्यक्ष नागपूर मा. श्री सुभाषजी घाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, राष्ट्रीय तेली समाज महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री नागपूर सौ. मंजू ताई कारेमोरे,
साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साई संताजी प्रतिष्ठाण अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य वधु - वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा. शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2019 रोजी संपन्न होणार आहे. सर्व समाज बांधवांनी आपल्या वधु-वरांचा सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 26 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपुर्ण महाराष्ट्रभरातून व्यावसायिक शिक्षण घेणा-या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना बारा लाख रुपये एवढया रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 446 विद्यार्थ्यांना 1 कोटी 20 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
मालेगांव येथील साहित्य संघाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते मालेगांव तेली समाजाचे रमेश उचित यांची साहित्य संघाच्या अध्यक्षपदी पुढील दोन वर्षासाठी फेर निवड करण्यात आली. मालेगांव साहित्य संघाची बैठक कॅम्प सार्वजनिक वाचनालयात नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी श्री उचित यांच्या निवडीचा ठराव बहुमताने संम्मत झाला.