Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व भव्य दिव्य दिंडी शोभा यात्रा आयोजन करण्यात आले होते. तेली युवा संघटना महाराष्ट्र राज्य ग्रुप तर्फे सर्व समाज बांधवा छत्रपती संभाजी नगर कार्यक्रमाचे वेळी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पूजन माजी नगर सेवक भा ज पा कार्यकारणी प्रदेश अध्यक्ष अनिल भैय्या मकरिया साहेब यांच्या हस्ते करण्यात आले
कोपरगाव येथे आज संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व यावेळी आयोजित ह.भ.प. अरुण महाराज मगर यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला.
जळगांव जामोद व संग्रामपूर तालुका, जिल्हा बुलढाणा तेली समाज राज्यस्तरीय भव्य मोफत वधु -वर व पालक परिचय मेळावा तथा सोयरिक पुस्तिकेचे विमोचन स्थळ : सांस्कृतिक भवन, जलाराम मंदीराजवळ, जळगांव जामोद जि. बुलढाणा - ४४३४०२ टिप : सोयरिक पुस्तकात परिचय पत्र मोफत छापण्यात येणार आहे. परियच पत्र देण्याची अंतिम तारिख २५/०१/२०२४
मुंबई : श्री वारकरी प्रबोधन महासमिती ( महाराष्ट्र) तर्फे पांडुरंग पालखी सोहळा कॉटनग्रीन येथील राम मंदिर ते वडाळ्यामधील विठ्ठल मंदिरपर्यंत आयोजित करण्यात केला आहे. पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून लालबागमधील तेली समाज संत संताजी जगनाडे महाराज चौक येथे भव्य प्रमाणात केले जाणार आहे.
मार्गशीर्ष कृ. त्रयोदशी म्हणजेच दिनांक 9-1-2024 मंगळवार रोजी तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा ठिकाण - माऊली (मंदिर) मंगल कार्यालय, वरचा मजला नांदगाव येथे अध्यक्ष व खालील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित