परभणी - आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती मंगळवार ८ डिसेंबर रोजी नांदखेडा रोडवरील पलसिध्द सेवाआश्रम येथे साजरी करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या परभणी जिल्हा शाखेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिंतूर येथे राष्ट्रसंत वैकुंठवाशी श्री तुकाराम महाराज मुळ गाथा लेखक तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मराठवाडा तेली महासंघाच्यावतीने साजरी करण्यात आली.
परभणी - आराध्यदैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९५ वी जयंती नांदखेडा रोडवरील पलसिध्द सेवाआश्रम येथे साजरी करण्यात आली या जयंती चे आयोजन येथील महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या जिल्हा शाखा परभणी च्या वतीनेकरण्यात आले प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत संत श्री संताजी जगनाडे महाराज याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण पुजन करण्यात आले.
गंगाखेड - महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.आज समाजात घडत असलेल्या अनुचित घटना लक्षात घेता समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे असे प्रतिपादन राम दावबाजे यांनी केले.
शिरपूर - श्री संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमीत्त शासकीय कार्यालय प्रांताधिकारी व तहसिलदार कार्यालय शिरपूर येथे शासकिय जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी श्री संताजी महाराज प्रतिमेचे पूजन प्रांत विक्रम बांदल, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.