नागपुर, 8 दिसंबर. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभी कि ओर से संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज की जयंती पर जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन में संताजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया.
पुणे - 8 डिसेंबर तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती उत्सव छावणी येथील सुभाष रत्नपारखी यांच्या निवास्थानी साजरी करण्यात आली, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणन श्री.निलेश धारकर तसेंच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष रत्नपारखे हे होते.
महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखल्या जाते. अशा या सुजलाम - सुफलाम महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वारसा एकामागन एक देत अनेक संत होऊन गेले. या सर्व संतानी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचे ढोंग उघडे पाडले आणि हे सर्व करीत असतांना स्वतःच्या घरादाराची, स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा केली नाही.
संतू म्हणे मी तेल काढीयले । म्हणूनी नाव दिले संतू तेली ।। संतु तेली घाणा करी। घाणा केल्यावर तुक्याचे अभंग लिही ।।
थोर संत संताजी जगनाडे महाराज म्हटलं की सोबत संत तुकाराम महाराज यांचे विचार आणि त्यांची गाथा डोळ्यासमोर उभी राहते. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1664 रोजी पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला.
संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी ८ डिसेंबर १६२४रोजी झाला. संताजींचे वडील विठोबा यांचा परंपरागत असा धान्यापासून तेल गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. संताजींचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरात वंशपरंपरेने पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी अखंडित होती. घरातच ग्रंथांचे वाचन, पारायणे चालत. त