7 एप्रिल अमरावती - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती व यवतमाळ विभागा द्वारे आयोजित रेषीमगाठी वार्षिक 2021 तेली समाज उपवर - वधु पुस्तक प्रकाशन हा कार्यक्रम, शंकरराव हिंगासपुरे यांच्या राहत्या घरी नुकतेच करण्यात आले. रेषीमगाठी वार्षिक 2021 या तेली समाज उपवर-वधु पुस्तिकेचे विमोचन खा. रामदास तडस व उपस्थित मान्यवराचे हस्ते करण्यात आले.
यवतमाळ दि. १९ विदर्भ स्तरीय तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ यवतमाळ द्वारे आयोजित शुभमंगलम उप-वधु-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केवळ परिचय पुस्तिकेच्या आधारे निर्णय घेवू नये, त्याची योग्य ती शहानिया करुनच निर्णय घ्यावा.
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाव्दारे विदर्भस्तरीय तेली समाजाचा ३३ वा उपवधू-वर परिचय पुस्तीका "शुभ मंगलम् प्रकाशन सोहळा" संताजी मंदिर संकटमोचन रोड, यवतमाळ येथे रविवार दि. १४/२/२०२१ रोजी सकाळी ९ वा आयोजित केला आहे. दरवर्षी मंडळ मोठ्या स्तरावर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत असते परंतु यंदा कोवीड-१९ या जागतीक महामारीमुळे मेळाव्याचे आयोजन करणे शक्य झाले नाही.
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा विभाग अमरावती - यवतमाळ - अकाेला
रेशीमगाठी स्मरणिका प्रकाशन सोहळा व सत्कार समारंभ
नोंदणी क्र. महा./२५५/९४ व एफ ११६३७/९५ विभागीय कार्यालय : श्री विठ्ठल रुखमाई मंदिर संस्थान, अंबागेटच्या आत, अमरावती.
उपवधु-वर परिचय पुस्तीका “रेशीमगाठी" मध्ये नोंदणी साठी संपर्क
अमारावती जिल्हा तैलिक समिती अमरावती
मुख्यकार्यालय श्री संताजी महाराज प्रार्थना मंदिर, भुमीपुत्र कॉलनी, कॉंग्रेस नगर जवळ, अमरावती
उपवर उपवधू नोंदणी फॉर्म 2020 - 21