Sant Santaji Maharaj Jagnade
अकोला, ३ नोव्हेंबर २०२५ – श्री संताजी महाराज स्नेही मंडळ, अकोला यांच्या वतीने तिळवण तेली समाज वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे.
प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने प्रथमच मोफत राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२५ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ३ वाजेपर्यंत होईल.
नागपूर: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जवाहर विद्यार्थी गृहाच्या वतीने आयोजित तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याला सिव्हिल लाइन्स येथील लॉनवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी भूषवले.
पुणे: तेली सेना महाराष्ट्राच्या वतीने पुण्यातील चंदननगर येथे रविवार, 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता मातोश्री अनुसया सांस्कृतिक भवन, साईबाबा मंदिराजवळ भव्य वधू-वर परिचय मेळावा आणि लग्नगाठ विशेषांक 2025 आयोजित करण्यात येत आहे. हा मेळावा विवाह इच्छुक तरुण-तरुणींसाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार असून, तेली समाजातील लग्न जुळवण्यासाठी समर्पित प्रयत्नांचा भाग आहे.
अमरावती: मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा, समाज गौरव पुरस्कार, दसरा मिलन आणि विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम ५ ऑक्टोबर २०२५ रोजी हर्ष मंगलम, शंकर नगर, हरिगंगा ऑईल मिल जवळ, अमरावती येथे अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने संपन्न झाला. हा सोहळा समाजाच्या एकजुटीचे आणि प्रगतीचे प्रतीक ठरला,