वेंगुर्ला तालुक्यातील मांगल्याचा मठ या गावी तेली समाजाचे श्री भूमिका देवीचे मंदिर आहे. या मंदिराचा पूर्वइतिहास काही जात नाही परंतु या समाजाची मुळे कुलदेवता साळशी (ता. देवगड) येथे आहे. त्या देवीच्या प्रतिमेनुसार सन २००० साली या देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून या मंदिरात वर्षातून दोन उत्सव साजरे केले जातात. या मंदिरात श्री भूमिका देवीच्या मूर्तीसोबत मुळपुरुष म्हणून श्रीफळाची पूजा केली जाते.
मालवणमध्ये देऊळवाड्यातील तेलीवाडीत भाद्रपद महिन्यात गौरी विर्सजन कार्यक्रम संपल्यावर रात्रौ वाडीतील सर्व कुटुंबे एकत्र येऊन गौरीच्या नैवेद्यासाठी बनविलेल्या भाकरी आणि शेवग्याची भाजी करतात ती एकमेकांना वाटतात. सर्व इष्ट, मित्रमंडळी व तेली कुटुंबे नैवेद्यम्हणून स्नेहभोजनाचा समारोह गेली कित्येक पिढ्या साजरा करत आहेत.
श्री देव कलेश्वर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला
श्री देव कलेश्वराचा इतिहास जूना असला तरी त्याचे कागदोपत्री बऱ्याच वेळा नावे बदलली गेली असे दिसून आले येथील वेंगुर्ला गावी तेली समाजाचा विस्तार पहाता पूर्वी सगळ्यात माेठा समाज वेंगुर्ला ग्रामी होता असे असले तरी आजची वस्ती हि किरकोळ दिसून येते. पूर्वीच्या काळी आजची भूजनागवाडी येथील श्री देव कलेश्वर मंदिर हे तेली समाजाचे श्री देव कलेश्वर मंदिर म्हणून प्रसिध्द होते. वस्तूस्थिती अशी आहे की त्या मंदिराचे खरे नाव कुळकार देवस्थान म्हणूनच होते.
देवगड तालुक्यातील हिंदळे येथील तेली समाज बांधवांचे दैवत श्री भवानीमातेचे हिंदळे राणेवाडी येथेमंदिर आहे. येथे दर तीन वर्षांनी श्री देवी भवानी मातेचा गोंधळ उत्सव असतो. या उत्सवासाठी हजारो तेली बांधव उपस्थित असतात. मुंबईकर
देवगड तालुक्यात तोरसोळे येथे एकमेव तेली समाज मंदिर आहे. या मंदिरामध्ये संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा असून त्याची नेहमी पूजाअर्चा केली जाते. येथील तेली बांधवांनी एकत्र येऊन हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात येथील समाजाचे वार्षिक उत्सव होतात.